महाराष्ट्राची ऐतिहासिक उपेक्षा!

file photo
file photo
Updated on

मुंबई : पुरातन महत्त्व असलेल्या देशातील पाच ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे वस्तुसंग्रहालय उभारण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे; मात्र यात महाराष्ट्रातील एकाही ठिकाणाचा समावेश करण्यात आला नसून, जाहीर झालेल्या पाचपैकी चार राज्यांत भाजपचे सरकार आहे. 

हरियाना येथील राखीगढी, उत्तर प्रदेशमधील हस्तिनापूर, आसाममधील शिवसागर, गुजरातमधील ढोलाविरा आणि तमिळनाडूतील अदिच्चनल्लूर या पाच पुरातन महत्त्व असलेल्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. यातील तमिळनाडू राज्य वगळता इतर राज्यात भाजपचे सरकार आहे.

हेही वाचा : गॅसवाहिनीच्या परिसरात राहणे धोकादायकच : न्यायालय

 महाराष्ट्रातील ऐतिहासिक पाऊलखुणांचा विचार करता, 350 हून अधिक गडकिल्ले आहेत. महत्त्वाची 34 ते 40 लेणी असून लहान-मोठी शेकडो लेणी आहेत. ती साधारण अडीच हजार वर्षांपूर्वीची आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचे संवर्धन आणि विकासाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी साधारण 600 ते 700 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या कामासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. इतर गड-किल्ले आणि लेण्यांच्या संवर्धनाचेही काम सुरू आहे. 

हेही वाचा : बलात्कारात मदत करणाराही तेवढाच दोषी 

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळागड 12 व्या शतकात राजा भोज यांनी बांधल्याचा अंदाज आहे. तर, शिवनेरी किल्ला सातवाहन काळापासून उभा आहे. हा काळ इसवी सनपूर्व 230 पासून सुरू होतो. अर्थात, साधारण सव्वादोन हजार वर्षांपूर्वीपासून. तसेच, महाराष्ट्रातील लेणी खोदण्याचा कालावधीही इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापासून सुरू होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.