मुंबई : मुस्लिम समाजातील मोहरम मिरवणुकीला (mohram festival) आणि विधींना मुंबई उच्च न्यायालयाने 9mumbai high court) आज सशर्त परवानगी (permission) दिली आहे. तसेच लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेल्या भाविकांना (two dose vaccinated people) दक्षिण मुंबईमधील (south Mumbai) ताजिया शोक मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. आणि रस्त्यावर चालत मिरवणूक होणार नसून ट्रकवरुन मिरवणुकीला परवानगी देण्यात आली आहे.
न्या के के तातेड आणि न्या प्रुथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपिठापुढे दक्षिण मुंबईमधील औल इंडिया इदारा-ए-तहफूज-ए-हुसेनियात या संघटनेच्या वतीने एड राजेंद्र शिरोडकर यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. न्यायालयाने ता 20 रोजी शिया मुस्लिम संघटनेला मोहरमनिमित्त प्रतिकात्मक शोक मिरवणूक काढण्याची परवानगी दिली.
डोंगरी ते माझगाव कबरीस्तान या दरम्यान ही परवानगी असून दुपारी 4 ते सांयकाळी 7 पर्यंत परवानगी आहे असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. सात ट्रकमधून भाविक यामध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच एका ट्रकमध्ये पंधरा जणांना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये पाच ताजियांची परवानगी असली तरी कबरीस्तानमध्ये पंचवीस भाविकांना परवानगी देण्यात आली आहे.
यामध्ये सामिल होणाऱ्या भाविकांनी त्या विभागातील पोलीस उपायुक्तांकडे माहिती द्यावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. संबंधित निर्देश मुंबईपुरते असल्याचा आणि राज्यात अन्यत्र लागू नसल्याचा खुलासाही खंडपीठाने केला आहे. ज्या भाविकांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत आणि दुसरा डोस घेतल्यानंतर चे चौदा दिवस झाले आहेत त्यांना ट्रकवर परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने याचिकेतील मागण्यांना विरोध केला होता. यामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. कोरोना संसर्गामुळे प्रत्येक धर्मियांनी त्यांचे सण साधेपणाने आपापल्या घरांमध्ये साजरे करावे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. तसेच सार्वजनिक सण उत्सवांवर बंधन लावली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.