मुंबई : आता फक्त लसवंतांचाच होणार लोकल प्रवास

लसवंतांना मासिक पासाप्रमाणे तीन, सहा महिन्यांचा पास मिळणार
Corona Vaccination
Corona Vaccinationsakal media
Updated on

मुंबई : वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, जल पुरवठा या सेवेतील शासकीय अधिकारी (Government Officers) आणि कर्मचाऱ्यांना आता लसीच्या दोन्ही मात्रा (vaccine two dose) घेणे अनिवार्य (compulsory) करण्यात आले आहे. त्यामुळे आता फक्त कोरोना लसीच्या दोन्ही डोस घेतलेल्या लसवंतांचाच लोकल प्रवास करता येणार आहे. तर, लसवंताना मासिक पासाप्रमाणे (monthly pass) तीन, सहा महिन्यांचा पास मिळणार आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून (mva government) देण्यात आली आहे.

Corona Vaccination
"अनुपालन अहवाल न दिल्यास हिवाळी अधिवेशनात प्रशासनाला धारेवर धरणार"

आवश्यक सेवेत काम करणाऱ्यांना आतापर्यंत त्यांनी लस घेतली आहे किंवा नाही हे न बघता रेल्वेचा पास देण्यात येत होती. परंतु आता लसीकरणाला सुरुवात होऊन बराच वेळ झालेला आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाची प्रक्रिया गतीने चालू आहे आणि लसींचा साठाही मुबलक आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांमार्फत लसींचा पुरवठाही सुरळीत होत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेशी संबंधिताना लस अनिवार्य करण्यात आली आहे.कोरोना काळात अत्यावश्यक सेवेवर विपरित परिणाम होऊ नये, म्हणून अशा कर्मचाऱ्यांना लसीकरणातून सूट दिली गेली होती. मात्र आता लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या शिवाय रेल्वेचा पास मिळणार नाही, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली.

ज्या नागरिकांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांना लोकलचा पास मिळत आहे. तर, आता आवश्यक सेवेतील तसेच शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना यात सामील करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे प्रवासाठी सार्वत्रिक राज्य सरकारने 08 ऑक्टोबर 2021 रोजी लसीकरण झालेल्या व्यक्तींची व्याख्या केली होती. त्यामध्ये ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहे आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेले आहे. रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी पूर्ण लसीकरणाची अट घालण्यात आली होती.

Corona Vaccination
अंधेरीचे सेव्हन हिल्स हॉस्पिटल इतर रुग्णांसाठीही सुरु करा - अभिजीत सामंत

याचा विस्तार करून आता यात आवश्यक सेवेतील तसेच शासकीय सेवेतील लोकांना सामील करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यापुढे प्रवासासाठी सार्वत्रिक (युनिव्हर्सल) पास कोरोनाचे दोन्ही डोस झालेल्या आणि त्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेल्यांना दिला जाईल. युनिव्हर्सल पास देण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असो किंवा नसो, पण संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशांना लोकल किंवा पॅसेंजर ट्रेनचे मासिक पासाप्रमाणे तीन महिन्यांचे, सहा महिन्यांचे पास देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

लोकल तिकिट सुविधा आता बंद

26 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारच्या महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून जाहिर केलेल्या परिपत्रकामध्ये लोकल दैनंदिन तिकिटाबाबत कोणताही उल्लेख केला नाही. तर, आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह सर्वांना कोरोना लसीचे दोन डोस अनिवार्य केले आहेत. संपूर्ण लसीकरण या गटात सर्वांना समाविष्ट केले आहे. परिणामी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्रावर मिळणारे लोकलचे तिकिट देखील बंद होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. या सर्व प्रवाशांना मासिक पास, त्रैमासिक पास, सहामाही पास दिले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.