Maratha Reservation: "मविआच्या नेत्यांनो मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा"; ठोक मोर्चाकडून मुंबईत बॅनरबाजी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या प्रचंड चर्चेचा मुद्दा बनला आहे.
Maratha Reservation
Maratha Reservation
Updated on

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या प्रचंड चर्चेचा मुद्दा बनला आहे. यासाठी सध्या आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यातील विविध भागांमध्ये शांतता मोर्चे घेतले आहेत. त्याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.

यापार्श्वभूमीवर मविआच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे बॅनर दक्षिण मुंबईत लागले आहेत. यामुळं मविआवर देखील दबाव निर्माण होत असल्याचं चित्र आहे. (MVA leaders should explain stand on Maratha Reservation banner in South Mumbai by Maratha Kranti Thok Morcha)

Maratha Reservation
तुला सासरा नाही दुसरा बाप मिळालाय! बिदाईला राधिकाला रडताना पाहून मुकेश अंबानींची ती कृती; नेटकऱ्यांचा कौतुकाचा वर्षाव

मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून दक्षिण मुंबईत बॅनर लावण्यात आले आहेत. यामध्ये 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनो आपली भूमिका स्पष्ट करा. सांगा मराठा समाजाच्या बाजूनं आहात की नाही? का फक्त मतांसाठी आमचा वापर करणार? आरक्षणाची स्पष्ट भूमिका तत्काळ जाहीर करा' असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांचे फोटो आहेत.

Maratha Reservation
"सुप्रीम कोर्टाचा निर्णय शरिया कायद्याच्या विरोधात," महिलांच्या पोटगीच्या अधिकाराला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध

सरकारनं नुकत्याच बोलावलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या आरक्षणासंदर्भातील बैठकीला महाविकास आघाडीचे नेते अनुपस्थित होते. यापार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.