Mahavikas Aghadi's Strong Protest Against the Government
मुंबई: रविवारी महाविकास आघाडीने (MVA) सरकारविरोधात 'जोडे मारो आंदोलन' केले. हे आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर स्थापित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडण्याच्या निषेधार्थ करण्यात आले. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी नौसेना दिनानिमित्त केले होते, मात्र हा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला होता, ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये प्रचंड संताप आहे.
या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते एनसीपी (SP) प्रमुख शरद पवार, शिवसेना (UBT) नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पक्षाच्या मुंबई युनिटच्या प्रमुख वर्षा गायकवाड यांनी सहभाग घेतला. हुतात्मा चौकावर ‘संयुक्त महाराष्ट्र’ आंदोलनातील शहीदांना श्रद्धांजली वाहून त्यांनी विरोध मार्चची सुरुवात केली. या आंदोलनात एनसीपी (SP) नेते राजेश टोपे आणि शिवसेना (UBT) नेते सुनील प्रभू यांनीही सहभाग घेतला. या आंदोलनाचा उद्देश महाराष्ट्रातील जनतेच्या संतापाला आवाज देणे हा होता.
आंदोलनादरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शाहू छत्रपती महाराज आणि शरद पवार हे हातात हात घालून या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत. हे दोघे जुने मित्र असून, शाहू महाराज खासदार होण्यामागे शरद पवार यांचा मोठा हात असल्याचे बोलले जाते.
शरद पवार यांनी कोल्हापुरातील न्यू पॅलेस इथे शाहू महाराजांची भेट घेतली होती. या भेटीनंतर, महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. शरद पवार यांनी या चर्चांबाबत प्रतिक्रिया देताना, "शाहू महाराज लोकसभा निवडणुकीत उभे राहिले तर आनंदच होईल," असे विधान केले.
सकाळी ११ वाजता हुतात्मा चौकातून आंदोलनाची सुरुवात झाली आणि हे आंदोलन गेटवे ऑफ इंडिया येथे संपले. या आंदोलनात कोल्हापुरातील काँग्रेस खासदार शाहू छत्रपती, राष्ट्रवादी काँग्रेस (SP) खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार अनिल देशमुख हे देखील सहभागी झाले होते. हुतात्मा चौकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता, आणि आंदोलक हातात सरकारविरोधात बॅनर धरून जोडे मारत होते
राष्ट्रवादी काँग्रेस (SP) प्रमुख शरद पवार काही अंतरापर्यंत या विरोध मार्चमध्ये सहभागी झाले आणि नंतर आपल्या वाहनातून निघून गेले. हे आंदोलन शांततेत पार पडले आणि गेटवे ऑफ इंडिया येथे समाप्त झाले, जे हुतात्मा चौकापासून काही किलोमीटर अंतरावर आहे.
महाविकास आघाडीने सरकारवर जोरदार टीका केली असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळल्याच्या घटनेबद्दल तात्काळ जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. आंदोलकांनी ही घटना महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना दुखावणारी असल्याचे सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.