धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर सुपरफास्ट स्पेशल रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर सुपरफास्ट स्पेशल रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दीक्षाभूमीला जाणाऱ्या अनुयायांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 01076 नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वन वे स्पेशल सुपरफास्ट एक्सप्रेस 15 ऑक्टोंबर 2022 रोजी नागपूर येथून दुपारी 1.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक 01078 नागपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे स्पेशल सुपरफास्ट एक्सप्रेस 18 ऑक्टोंबर 2022 रोजी नागपूर येथून दुपारी 1.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. यादोन्ही वन वे स्पेशल सुपरफास्ट एक्सप्रेस वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर स्थानकांवर थांबणार आहे.
तसेच या विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग शुक्रवारपासून सर्व पीआरएस केंद्रावर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.