मुंबई: कोविड 19 च्या संसर्गामुळे अजूनही घरातून बाहेर पडायला घाबरत आहेत. त्यामुळे मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. शिवाय, रुग्णालयात सध्या नॉन कोविड रुग्ण देखील वाढत असल्याने त्यांना ही रक्ताची गरज भासत आहे. हळूहळू शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. मात्र, त्यांची ही रक्ता अभावी ओढाताण होत आहे. नातेवाईकांना रक्तासाठी मदत मागावी लागत आहे. त्यामुळे, नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरांकडूनच रक्तदानाचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईतील बहुतांश रुग्णालये सध्या कोरोना व्यतिरिक्त आजारांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे इतर आजारांचे रुग्ण सरकारी रुग्णालयात येणे सुरु झालेत. यातून आता रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना रक्त तुटवडा भासू लागला आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टर रक्तदानासाठी पुढे सरसावले आहेत.
सध्या कोविड काळ सुरु असल्याने रुग्णालय व्यतिरिक्त बाहेर घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला अल्प प्रतिसाद दिला जात आहे. शिवाय महाविद्यालयीन सुट्ट्या सुरु असल्याने आणि कोरोना काळ असल्याने तरुण रक्तदान करण्यास मर्यादित स्वरूपात पुढे येत आहे.
त्यामुळे सध्या रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यात कोरोनात्तोर रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येणे सुरु झाले आहे. यावर नायरमधील डॉक्टरांनी उपाय शोधून काढला. दर वेळेप्रमाणे सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान करण्याचे ठरवले आहे.
यावर बोलताना नायर मार्ड चे अध्यक्ष डॉ. सतीश तांदळे यांनी सांगितले की, नॉन कोविड रुग्ण वाढत असून थांबलेल्या शस्त्रक्रिया सुरु झाल्या आहेत. यासाठी रक्ताची गरज लागत आहे. त्यामुळे सर्व डॉक्टरांना रक्तदानासाठी आव्हान करण्यात येत असल्याचे डॉ. तांदळे म्हणाले.
दरम्यान, नायर रुग्णालयात एकूण 610 डॉक्टर आहेत. यात 450 रेसिडेंट, 50 सुपर स्पेशालिटी डॉक्टर आणि इंटर्न 110 असे मिळून 610 डॉक्टर आहेत. हे सर्व 26 नोव्हेंबर रोजी रक्तदान करणार आहेत. प्रोफेसर, डॉक्टर, कर्मचारी देखील रक्त दानासाठी सरसावले आहेत.
कोविड दरम्यान होणाऱ्या रक्तदान शिबिरातून बेड सॅनिटायझ करणे, डॉक्टरांनी पीपीई किट वापरणे, टेस्ट करून कोरोना पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाहणे, पॉझिटिव्ह असल्याची हिस्ट्री असल्यास त्यातील प्लाझ्मा कोरोना रुग्णांना वर्गीकृत करणे या निकषांवर आज नायर रुग्णालयातील होणारे रक्तदान शिबीर होणार आहे. या पूर्वी कोरोना संसर्ग झालेले डॉक्टर अनेक असून त्यांचा प्लाझ्मा या वेळी कोरोना रुग्णांना वापरण्यात येणार असल्याचे डॉ. सतीश तांदळे यांनी सांगितले.
-------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Nair Hospital Doctors blood donation non-covid patients donation done covid rules
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.