Big Breaking: नालासोपारा पोलिसांनी जप्त केला 327 कोटींचे ड्रग्स, अंडरवल्ड संबंधित 15 आरोपींना झाली अटक

Drugs Crime Update: मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या काशीमीरा क्राईम ब्रँच 1 ची देशातील मोठी कारवाही
Big Breaking: नालासोपारा पोलिसांनी जप्त केला 327 कोटींचे ड्रग्स, अंडरवल्ड संबंधित 15 आरोपींना झाली अटक
Nalasopara police sakal

Nalasopara Latest Crime News : देशातील महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, उत्तरप्रदेश या 4 राज्यात एम डी मॅफेड्रॉन नावाचे अम्लीपदार्थ बनवून, त्याची विक्री करणाऱ्या, अंडरवल्ड संबंधित टोळीचा पर्दाफास करण्यात मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या काशीमीरा क्राईम ब्रँच 1 च्या पथकाला मोठे यश आले आहे.

या पथकाने तब्बल दीड महिना अथक परिश्रम करून, महाराष्ट्रातील 03, तेलंगणा 03, उत्तरप्रदेश 08, आणि गुजरात येथून 01 असे अंडर्वल्ड संबंधित 15 आरोपी अटक करून, त्यांच्याकडून 327 करोड 69 लाख 43 हजार 60 रुपये किमतीचा एम डी मॅफेड्रॉन नावाचे अम्लीपदार्थ, कच्चे एम डी, एम डी बनविण्यासाठी लागणारे केमिकल्स, इतर साहित्य, 3 पिस्टल, एक रिव्हॉल्वर, 33 जिवंत काडतुसे असे जप्त केले आहे.

Big Breaking: नालासोपारा पोलिसांनी जप्त केला 327 कोटींचे ड्रग्स, अंडरवल्ड संबंधित 15 आरोपींना झाली अटक
Hanuman Nagar Crime : कुटुंब देवदर्शनासाठी गेल्याची चोरट्यांनी साधली संधी; गजबजलेल्या हनुमाननगरात फोडला बंगला!

शोएब हनिफ मेमन (वसई), निकोलेश लिओफ्रेड टायटस ( वसई), दयानंद उर्फ दया माणिक मुद्दनार (हैद्राबाद तेलंगणा ), नसीर उर्फ बाबा जानेमिया शेख (हैद्राबाद तेलंगणा), घनश्याम रामराज सरोज (यूपी), मोहम्मद शकील मोहम्मद मोईन (हैद्राबाद तेलंगणा), भरत उर्फ बाबू सिद्धेश्वर जाधव (महाराष्ट्र शहापूर), झुल्फिकार उर्फ मूर्तझा मोसीन कोठारी (गुजरात), बाबू तौफिक खान (यूपी), मोहम्मद नदीम मोहम्मद शफीक खान ( आजमगड यूपी), एहमद शाह फैसल सेफिक आझमी ( आजमगड यूपी), अमीर तौफिक खान, मोहम्मद शादाब मोहम्मद शमशाद खान, आलोक वीरेंद्र सिंह (सर्व रा, आजमगड यूपी), अभिषेक उर्फ शुभम नरेंद्र प्रताप सिंह ( जोनपूर यूपी) असे अटक आरोपींची नाव आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 15 मे रोजी क्राईम ब्रँच युनिट 1 चे पथक गस्त घालीत असताना, MH 48 D 1101 नंबर च्या राखाडी रंगांच्या गाडी मधून ठाणे घोडबंदर मार्गे मीरा भाईंदर शहरात एम डी मॅफेड्रॉन नावाचे अम्लीपदार्थ विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहिती वरून चेना गाव द्वारका हॉटेल जवळ नाकाबंदी करीत असताना, नाकाबंदीत संशयास्पद गाडी आढळून आली. तिची झाडाझडती घेतली असता, या गाडीत वसईतील शोएब आणि निकोलेश या दोन आरोपीसह 2 कोटी रुपये किमतीचे 1 हजार ग्रॅम एम डी मॅफेड्रॉन नावाचे अम्लीपदार्थ पोलिसांना मिळून आले. गाडी सह अम्लीपदार्थ जप्त करून, दोन आरोपीवर NDPS कायदा 1985 चे कलम 8 (सी) 22 (सी) 29 प्रमाणे काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Big Breaking: नालासोपारा पोलिसांनी जप्त केला 327 कोटींचे ड्रग्स, अंडरवल्ड संबंधित 15 आरोपींना झाली अटक
Thane Ulhasnagar Crime: वाढदिवशी पार्टीमध्ये दारू कमी पडली! 'बर्थ डे बॉय'ला 3 मित्रांनी चौथ्या मजल्यावरून फेकलं

गुन्ह्याचे रॅकेट देशातील विविध राज्यात पसरलेले असल्याचे प्राथमिक पोलीस तपासात उघड झाल्यावर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, क्राईम ब्रँच युनिट एक चे प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, पुष्पराज सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा दीड महिन्यापासून तपास सुरू केला होता

शोएब या आरोपीच्या माहिती वरून, तेलंगणा राज्यातील सायबराबाद येथील राजेंद्र नगर मध्ये 17 मे रोजी छापा टाकला असता दयानंद आणि नसिर या दोन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन, विकाराबाद जिल्ह्यातील मंडळ मारपल्लीच्या नरसपूर येथे एम डी मॅफेड्रॉन बनविण्याचा कारखाना असल्याचे उघड झाले. या कारखान्यातून 20 लाख 60 हजार रुपये किमतीचे 103 ग्रॅम एम डी पावडर, 25 करोड रुपये किमतीचे 25 किलो कच्चे एम डी केमिकल, एम डी बनविण्याचे लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर दयानंद या आरोपीच्या तपासात घनश्याम, मोहम्मद शकील आणि भरत जाधव या तीन आरोपींची नाव समोर आली. घनश्याम या आरोपीला यूपी च्या वाराणशी येथून तर शकील याला मुंबई गोरेगाव मधून अटक केले. शकील या आरोपीच्या swipt कार मधून 14 लाख 38 हजार किमतीचे 71.90 ग्रॅम वजनाचे एम डी मॅफेड्रॉन जप्त केले. तर भरत जाधव या आरोपीला 27 मे रोजी ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथून अटक करून, त्याच्या पडघा लाप बुद्रुक येथील घरातून 53 हजार 710 रुपयांचे एम डी बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि केमिकल जप्त केले आहे.

Big Breaking: नालासोपारा पोलिसांनी जप्त केला 327 कोटींचे ड्रग्स, अंडरवल्ड संबंधित 15 आरोपींना झाली अटक
Nashik Fraud Crime : पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धेला गंडा; पंचवटीच्या हिरावाडीतील घटना

एम डी बनविण्यासाठी लागणारा पैसा, विकलेल्या एम डी चा पैसा कुठे जातो, कसा येतो याचा तपास केला असता, मुंबईच्या सलीम डोळा आणि गुजरात च्या झुल्फिकार कोठारी या आरोपींची नाव समोर आली. यातील सलीम डोळा हा फरार आहे. तर झुल्फिकार या आरोपीला 31 मे रोजी गुजरात सुरत येथून ताब्यात घेऊन, सलीम डोळा याने पाठवलेली 10 लाख 84 हजार रोख रक्कम त्याच्याकडून जप्त केली आहे. तसेच काही रक्कम मुंबई येथील अंगडीया (हवाला) यांच्या मार्फत पोलीस तपासात उघड झाले आहे. या तापासावरून मुंबई भेंडी बाजार येथून मुस्ताफा युसुफभाई फर्निचरवाला, हुसेन मुस्ताफा फर्निचरवाला या दोघांना ताब्यात घेऊन, सलीम डोळा याने पाठवलेली 6 लाख 80 हजार 200 रुपये रोख जप्त केली.

पोलीस तपासाची सूत्र वेगाने फिरत असताना सलीम डोळा आणि अटक आरोपी दयानंद यांचे साथीदार अमीर तौफिक खान आणि त्याचा भाऊ बाबू तौफिक खान त्यांचे साथीदार आणि इतर लोका मार्फत एम डी बनविण्याचे युनिट चालवीत असल्याचे उघड झाले. उत्तरप्रदेश च्या आजमगड येथून बाबू तौफिक, मोहम्मद नदीम, एहमद शहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, 300 करोड रुपये किमतीचे एम डी बनविण्यासाठी लागणारे साहित्य, 300 किलो वजनाचे 12 कच्चे एम डी dram, जप्त केले. यातील तौफिक खान या आरोपीच्या माहिती वरून, अभिषेक उर्फ शुभम सिंह याला 1 जुलै राजी उत्तरप्रदेश च्या वाराणसी येथून अटक केले असता, त्याच्याकडून 53 हजार 300 रुपये किमतीचे 3 पिस्टल, एक रिव्हॉल्वर, 33 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहेत.

यातील आरोपींचे अंडरवल्ड शी संबंध असून, हवाला चा पैसा यात वापरला जात असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दीड महिना अथक परिश्रम करून, देशातील सर्वात मोठ्या अम्लीपदार्थ चालवणार्या रॅकेट चा पर्दाफाश करण्यात यश मिळविल्याने संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांकडून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय च्या क्राईम बरंच युनिट एक वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Big Breaking: नालासोपारा पोलिसांनी जप्त केला 327 कोटींचे ड्रग्स, अंडरवल्ड संबंधित 15 आरोपींना झाली अटक
Crime: 'तू दुसऱ्याच्या दुकानातून सामान कसा खरेदी केलास?'; किराणा दुकानदाराने ग्राहकाचा केला खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com