मुंबई : ‘‘महाराष्ट्र सरकारने संजयकुमार वर्मा यांची पोलिस महासंचालक म्हणून केलेली सशर्त नियुक्ती ही घटनात्मक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि स्थापित प्रशासकीय तत्त्वे यांचे उघडउघड उल्लंघन आहे. यामुळे पोलिस महासंचालकांना निवडणुकीच्या काळात तटस्थ आणि निष्पक्षपणे काम करण्यात अडचणींचा सामना करावा लागेल.