केंद्रीय मंत्री नारायण राणेंना BMC कडून पुन्हा नोटीस

नारायण राणेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता.
Narayan Rane
Narayan RaneTeam eSakal
Updated on

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मुंबई महानगरपालिकेने (BMC) पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. जुहूमधील (Juhu) अधीश बंगल्याच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी ही महापालिकेने ही नोटीस बजावली आहे. काही दिवसांपूर्वीच राणेंच्या घरी मुंबई महानगर पालिकेच्या पथकाने पाहणी केली होती. त्यानंतर आता नारायण राणेंना नोटीस बजावण्यात आली आहे.

Narayan Rane
'ईडी'पेक्षा शेतकऱ्याच्या खिशातल्या बिडीची किंमत जास्त - धनंजय मुंडे

मुंबई महानगरपालिकेच्या 9 अधिकाऱ्यांचं पथक नारायण राणेंच्या अधीश बंगल्यामध्ये दाखल झालं होतं. त्यावेळी त्यांनी कागदपत्रांची पडताळणी करुन नारायण राणेंना काही विचारपूस केली होती. नारायण राणे यांच्या जुहूमधील अधीश बंगल्यावर अनधिकृतपणे बांधकाम केल्याचा ठपका ठेवत मुंबई महानगरपालिकेने नारायण राणेंना नोटीस पाठवली होती. त्यानंतर नारायण राणेंनी आपण कोणत्याच नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं सांगितलं होतं. मात्र आता राणेंना पुन्हा एकदा BMC कडून नोटीस बजावण्यात आली आहे.

Narayan Rane
'एकदा नाही, चारवेळा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, कधी कुणी झालं होतं का?'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.