गुन्हे दाखल असतानाही भर पावसात नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा

स्वागताला आदिवासींचे तारपा नृत्य आणि बेंजो
narayan rane
narayan ranesakal media
Updated on

विरार : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या आदेशाने राज्यभर सद्या भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या (bjp central minister) जनाशीर्वाद यात्रा (janashirwad yatra) सुरु झाल्या आहेत. पालघर जिल्ह्यात (palghar district) आठ दिवसापूर्वी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार (bharati pawar) यांच्या जन आशीर्वाद यात्रे नंतर आता नवनियुक्त केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्या यात्रेला आज दुपारी भर पावसात सुरुवात झाली. दोन दिवसात जन आशीर्वाद यात्रेत गर्दी झाल्या बद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे (fir) दाखल झाले असले तरी त्यांना न जुमानता आज पुन्हा वसई (vasai) मध्ये हि यात्रा सुरु झाली. या यंत्राच्या स्वागता साठी आदिवासी तारपा नृत्य आणि बॅन्जोने चान्गलीच रंगत आणली होती .

narayan rane
मनसेने मालोडी टोलनाका फोडला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज सकाळी सडे दहा वाजता चिंचोटी नाक्यावरून सुरु होणार होती परंतु ही यात्रा पाऊस असल्याने दुपारी साडेबारा वाजता सुरु झाली. या यात्रेच्या स्वागताच्या निमित्ताने भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे चित्र दिसत होते. नारायण राणे यांच्या स्वागतासाठी येथील पारंपरिक तारपा नृत्य, बँड आणि बेंजो आणण्यात आला होता. या यात्रेत नारायण राणे यांच्या बरोबर आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे,नितेश राणे व वसई विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक,युवकचे राजू म्हात्रे व इतर भाजप पदाधिकारी सहभागी झाले होते.

यात्रेच्या सुरुवातीला नारायण राणे काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते परंतु स्वागताच्या ठिकाणी त्यांनी आपण नरेंद्र मोदी आणि भाजपमुळे मंत्री झाल्याचे सांगितले आणि केंद्राने गेल्या सात वर्षात केलेल्या विकास कामाची माहिती देण्यासाठी आणि पंतप्रधानासाठी आशीर्वाद मागण्यास आपण येथे आल्याचे सांगितले त्यांचे भाषण सुरु असतानाच उपस्थितांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्याने त्यांनी भाषण आवरते घेतले आणि ते पुढच्या ठिकाणी रवाना झाले . त्यामुळे ते राज्य सरकार , शिवसेना यांच्या बाबत काय बोलणार हे मात्र गुलदस्त्यातच राहिले. लग्न समारंभ,गणपती सणाला बेंजो वाजविण्यास राज्य सरकारने बंदी केली असतानाच जन यात्रेत बेंजो वाजविण्यासाठी सामील झालेल्या पथकाने सांगितले कि अश्या यात्रा रोज निघोट त्याने आमच्या उपाशी पोटाला भाकर तरी मिळेल . राज्य शासनाने आता तरी आमच्या कडे लक्ष देऊन गणपती पासून यावरील निरबंद उठवावेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()