मुंबई: राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांचा वाद तापलेला आहे. मनसेने उपस्थित केलेला हा मुद्दा आता राणा दाम्पत्याने उचलून धरला असून. राणा दांपत्याने ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. याचमुद्द्यावरून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणा दांपत्याला धडा शिकवण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमा झाले होते. दरम्यान शिवसैनिक आज रात्री मातोश्रीबाहेर जागता पहारा देणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.
शिवसैनिकांनी आपल्या नेत्यासाठी जागता पहारा देण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी खुद्द नारायण राणे यांनी देखील बाळासाहेब ठाकरेंच्या रक्षणासाठी त्यांच्या घराबाहेर जागता पहारा दिला होता.
आज जरी कट्टर विरोधक बनले असले तरी नारायण राणे एकेकाळचे कट्टर शिवसैनिक. शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा पासून त्यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी रस्त्यावरच्या आंदोलनात सहभाग घेतला. बाळासाहेबांच्या शब्दावर जीव ओवाळून टाकणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा समावेश व्हायचा. बाळासाहेब ठाकरेंनी देखील एक साधा नगरसेवक ते बेस्टचा चेअरमन ते आमदार या पायऱ्या वेगाने चढत गेलेल्या नारायण राणेंवर विश्वासाने मोठमोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. याच काळातला एक किस्सा नारायण राणे यांनी मध्यंतरी वार्ताहरांशी बोलताना सांगितलाहोता.
गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. राज्यात तेव्हा काँग्रेसची सत्ता होती. मुंबईत बाबरी मशिदीच्या पतनानंतर झालेल्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला होता.
अशातच मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे महत्वाची गुप्तचर माहिती आली कि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दहशतवाद्यांचा हल्ला होणार आहे व त्यांच्या जीवाचे बरे वाईट होऊ शकते. राजकीय विरोधक असले तरी बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्यात चांगली मैत्री होती. पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून बाळासाहेब यांच्यावरील संभाव्य हल्ल्याची माहिती दिली. लवकरातल्या लवकर बाळासाहेब ठाकरेंना मातोश्री बंगल्याच्या बाहेर हलवण्याची सूचना दिली.
नारायण राणे सांगतात, तेव्हा बाळासाहेबांनी मला फोन करून सांगितले की, मी घरातून बाहेर पडलो की तुझ्या गाड्या मागे आल्या पाहिजेत. ते मला अज्ञात स्थळी घेऊन गेले. बाळासाहेब जोपर्यंत अज्ञातवासात होते तोपर्यंत मी झोपलो नव्हतो. रात्री वाहनातच झोपायचो. कुठून तरी खायला आणायचो. कधी कधी माँसाहेब डबा पाठवायच्या अशी आठवण राणे यांनी सांगितली.
बाळासाहेबांच्या जीवावरच धोका जोपर्यंत हटला नाही तोपर्यंत नारायण राणे व शिवसैनिकांनी जागता पहारा दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.