राणे कुटुंबीय नेहमीच उद्धव ठाकरे यांच्यावर सडेतोड टीका करतात
मुंबई: आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची (Vitthal Rukmini) शासकीय महापुजा (Worship) करण्यात आली. "पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे", असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला (Lord Vitthal) घातलं. मुख्यमंत्री स्वत: काल कार ड्राईव्ह करून पंढरपूरला गेले. या गोष्टीवर माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना रोखठोक सवाल केला. (Narayan Rane son Ex MP Nilesh Rane Angry trolls CM Uddhav Thackeray over Ashadhi Ekadashi)
उद्धव ठाकरे विठ्ठलाच्या पुजेला निघाले तेव्हा अनेक माध्यमांनी ते स्वत: कार चालवत निघाल्याचे दाखवलं. ते आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे हे दोघे लँड रोव्हरने पंढरपूरला पोहोचले. याच मुद्द्यावरून निलेश राणे यांनी ठाकरेंना सवाल करत प्रसारमाध्यमांनाही सवाल केला. "जो माणूस महाराष्ट्र हातात येऊन चालू शकला नाही तो माणूस गाडी चालवत मुंबईबाहेर गेला तर त्यात काय मोठा पराक्रम??? विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही कारण इतक्या सहज पणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला माफी नाही", असे राणे यांनी ट्वीट केले.
दरम्यान, मनसेचे संदीप देशपांडे यांनीही या मुद्द्यावरून मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला लगावला. "हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग... पांडुरंग..", असं संदीप देशपांडे यांनी ट्वीट केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.