वसई-विरारमध्ये राणे समर्थक एकाकी; भाजपचा काढता पाय

Narayan Rane
Narayan Ranesakal media
Updated on

विरार : केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह व अपमानास्पद (disrespect statement) वक्तव्याविरोधात वसई-विरार (vasai-virar) शहरात शिवसैनिकांनी (shivsena strike) रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली होती. या प्रकरणात नारायण राणे यांना जमीन (bail) मंजूर झाला असला तरी त्यांच्या समर्थनार्थ वसई भाजप पुढे आलेला नाही.

Narayan Rane
उत्तर प्रदेश मध्ये लसीकरणात अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा; मुंबईत नाहक त्रास

परिणामी एकाकी पडलेले राणे समर्थक व भाजप उपजिल्हाध्यक्ष विश्वास सावंत चार-सहा कार्यकर्त्यांसोबत नालासोपारा पोलीस ठाण्यात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन देताना दिसले आहेत.केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शनिवार, २१ ऑगस्ट रोजी वसईत जनआशीर्वाद यात्रा केली होती. या यात्रेत भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उल्हास आणि जोशात नारायण राणे यांचे स्वागत केले होते. भाजप जिल्हाध्यक्ष राजन नाईक, उपजिल्हाध्यक्ष विश्वास सावंत, मनोज बारोट, युवा जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सिद्धेश तावड़े यांनी तर या स्वागत यात्रेत ठेका धरला होता. उपजिल्हाध्यक्ष मनोज पाटील यांनीही विरार-बोळींज येथे त्यांचे जंगी स्वागत केले होते. या स्वागत आणि संवादाची छायाचित्र त्यांनी सोशल मीडियावरही प्रसारित केली होती.

दिवसभर प्रचंड उत्साहात निघालेल्या या स्वागत यात्रेवर संध्याकाळी नारायण राणे यांनी बविआ आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन पाणी फेरले होते. या भेटीमुळे भाजप कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी पसरली. युवा जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सिद्धेश तावड़े व भाजप भटके व विमुक्त महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक शेळके यांनी याविरोधात घोषणाबाजी केली. मात्र नारायण राणे व आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आमची ३० वर्षांपूर्वीची मैत्री आहे, सांगत या भेटीचे समर्थन केले होते.

यावर भाजप जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी; नारायण राणे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात मैत्रीचे संबंध असतीलही; पण अशाप्रकारे राणे यांनी ठाकूर यांना भेटणे योग्य नाही. राणे यांची जन आशीर्वाद यात्रा हा पक्षाचा कार्यक्रम आहे. या यात्रेदरम्यान राणे हे ठाकूर यांना भेटल्याने वेगळा संदेश गेला आहे. या भेटीचा उपयोग बहुजन विकास आघाडीकडून येणाऱ्या निवडणुकीत करून घेतला जाईल. त्याचा फटका ठाकूर यांच्या विरोधात लढताना भाजपला बसेल, अशी खंत व्यक्त केली होती.तर ज्यांच्याविरोधात पक्षाला लढायचे आहे.

Narayan Rane
नाशिक एफआयआर प्रकरणात तूर्तास कारवाई करणार नाही : राज्य सरकार

त्यांच्याच मांडीला मांडी लावून आमचे नेते बसत असतील तर वसई विरारमध्ये पक्षाला भवितव्य काय असणार? असा प्रश्न वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांनी केला होता.दरम्यान; वसई भाजपमध्ये केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या कृतीबाबत नाराजी असतानाच; महाड़ येथे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. या विरोधात महाराष्ट्रभरात शिवसेना भाजप आणि नारायण राणे यांच्या विरोधात एकवटली असताना; वसई भाजपने मात्र या प्रकरणात अलिप्त रहाणे पसंत केले आहे.

विशेष म्हणजे या प्रकणात परिवहन मंत्री अनिल परब दबाव होता, हे समोर आल्यानंतरही वसई भाजप शिवसेनेविरोधात प्रतिक्रिया देण्याकरता पुढे आलेला नाही. परिणामी राणे समर्थक असलेल्या विश्वास सावंत यांनाच नालासोपारा पोलिसांना हा गुन्हा दाखल करून घेण्याचे निवेदन द्यावे लागले आहे.नारायण राणे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतरच विश्वास सावंत यांनाही वसई भाजपमध्ये प्रवेश देऊन जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी पावन करून घेतले होते. विशेष म्हणजे त्यांना उपजिल्हाध्यक्ष पदही मिळाले होते. तेव्हापासून राजन नाईक यांच्यासोबत प्रत्येक आंदोलनात आणि सभेत विश्वास सावंत सावलीसारखे होते. पण कालच्या प्रकरणात भाजप जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी अंग काढून घेतल्याने राणे समर्थक विश्वास सावंत एकटे पडले आहेत. तर भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यानीही याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. यामागे नारायण राणे यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची घेतलेली भेट हेच कारण सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.