Narcotics Control Bureau : ड्रग माफियांच्या आतापर्यंत 1000 कोटीच्या बेनामी मालमत्तावर टाच

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने ड्रग माफियांनी बेकायदेशीरपणे खरेदी केलेल्या 1000 कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तावर टाच आणली आहे.
Narcotics Control Bureau
Narcotics Control Bureauesakal
Updated on

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने ड्रग माफियांनी बेकायदेशीरपणे खरेदी केलेल्या 1000 कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तावर टाच आणली आहेत. मुंबईतील डोंगरी, मस्जिद बंदर, कुलाबा आणि इतर भागातील मालमत्तेचा कारवाईत समावेश आहे. ड्रग माफियांनी अंमली पदार्थांच्या व्यापारातून कमावलेल्या पैशातून बेनामी नावाने मालमत्ता खरेदी केल्या होत्या.

ड्रग माफिया त्यांचा पैसा बेनामी मालमत्तेमध्ये वळवत असल्याचे तपासात समोर आले आहे.याशिवाय ड्रग माफियांनी महाराष्ट्रातील इतर भागांत गोदामे आणि इतर मालमत्तांमध्येही गुंतवणूक केल्याचे एनसीबीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एनसीबीने शोधून काढले की ड्रग माफियाशी संलग्न असलेल्या काही मालमत्ता पाळीव श्वान आणि मांजरासारख्या पाळीव प्राण्यांच्या नावाने नोंदवल्या गेल्या आहेत.

छाननी टाळण्यासाठी एक या युक्त्याचा वापर ड्रग माफिया करत आहे.या व्यतिरिक्त माफियांनी निर्यात-आयात व्यवसाय करणाऱ्या, अथवा रिअल इस्टेट क्षेत्रात कंपन्यांमध्ये पैसा गुंतवल्याचे समोर आली आहे. अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या मुंब्रा येथील एका महिलेने तब्बल 15 फ्लॅट विकत घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले.

या मोडस ऑपरेंडी व्यतिरिक्त, एनसीबीने ड्रग माफिया सिंडिकेट वापरत असलेल्या आणखी नवीन तंत्राची ओळख पटवली आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, तोतया व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून देखील मालमत्ता विकत घेतल्या आहे. जेणेकरून खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचणे तपास यंत्रणांना अशक्य करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.