26/11 Mumbai Attack: स्टंट की मॉरल सपोर्ट? दहशतवादी हल्ला सुरू होता तेव्हा मोदी नियमांची पायमल्ली करुन मुंबईत आले होते

मोदी नियमांची पायमल्ली करुन मुंबईत आले होते.
Narendra Modi Mumbai visit
Narendra Modi Mumbai visit sakal
Updated on

वर्ष 2008, 26/11 चा हल्ला हा मुंबईकरांसाठी काळा दिवस होता. मुंबई हल्ल्यादरम्यान अनेक मुंबई पोलिसांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. अशात यादरम्यान नरेंद्र मोदीचा दौरा चर्चेचा विषय ठरला होता. या दौऱ्यावरुन त्यांना कडाडून टिका करण्यात आली होती. याच दौऱ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Narendra Modi Mumbai visit
Sanjay Raut on Narendra Modi: मुंबई दौऱ्यावरून राऊतांनी दिला सल्ला, सीमावादावरून कर्नाटकला सुनावण्याची मागणी

मोदींचा हा दौरा त्यावेळी सर्वांसाठी नकोसा दौरा होता. 26 नोव्हेंबरला मुंबईत काही ठिकाणी ब्लास्ट आणि हल्ले झाले. त्यात अनेक मुंबई पोलिसांनी आपला जीव गमावला.

अशातच याच्या दुसऱ्या दिवशी 27 नोव्हेंबर रोजी गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री देशमुख आणि उपमुख्यमंत्री आरआर पाटील यांना फोन करुन मुंबईला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र शहरात अद्याप ऑपरेशन सुरू असल्याने त्यांचा दौरा पुढे ढकलण्याचा विचार सुरू होता.

Narendra Modi Mumbai visit
PM Narendra Modi Mumbai Daura: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई सजली

याच दरम्यान वृत्तपत्रात बातम्या छापून आल की राज्यसरकार गुजरातच्या गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या सूचनांवर अवलंबून होते ज्यामध्ये दहशतवाद्यांनी फिशिंग ट्रॉलर वापरुन सागरी मार्गाने मुंबईत प्रवेश केलाय,असे सांगण्यात आले होते. देशमुख आणि त्यांच्या मंत्रालयातील लोकांनी हे वृत्त फेटाळून लावले. यावर देशमुख सरकारने गुजरात अधिकाऱ्यांकडून दिलेला इशारा अतिशय सामान्य स्वरुपाचा होता, असे म्हटले होते.

Narendra Modi Mumbai visit
Narendra Modi : 'मी मुंबईत असेन…' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खास मराठीत ट्विट

देशमुख सरकारच्या या वक्तव्यावर संतप्त झालेले मोदी नियमांची पायमल्ली करुन मुंबईत आले आणि थेट ट्रायडंट हॉटेलच्या बाहेर त्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले होते. याशिवाय महाराष्ट्रातील तीन उच्च पोलीस अधिकाऱ्यांसाठी ज्यांनी 26/11 च्या रात्री प्राण गमावले होते त्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. त्यानंतर मोदी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या कुटुंबियांशी धीर देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते.

मुंबईत दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू असताना त्यांचं असं प्रोटोकॉल तोडून मुंबईत येणे, सरकारवर टिका करणे, हे एकंदरीत कुणालाच आवडलं नव्हतं. त्यामुळे मोदींच्या या दौऱ्यावर त्या वेळी सर्व स्तरातून टिका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.