Narendra Modi: जगातील सर्वोत्तम देश बनविण्यासाठी मोदी पंतप्रधानपदी असणे गरजेचे, तिसऱ्यांदा घेतील शपथ, बड्या नेत्याचा दावा
वाशी, ता. १७ (बातमीदार) : देशातील १४० कोटी जनतेला नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी हवे असून तेच २०२४ मध्ये पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा पुन्हा शपथ घेतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशी येथे व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात महाविजय २०२४ अंतर्गत लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरू आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघाचा संकल्प दौरा मंगळवारी झाला.
या वेळी आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, ठाणे लोकसभा निवडणूकप्रमुख विनय सहस्रबुद्धे, नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक आदी उपस्थित होते.
महाविजय अभियानाच्या सांगताप्रसंगी झालेल्या चौक सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जनतेला आवाहन करताना भारताला जगातील सर्वोत्तम देश बनविण्यासाठी पंतप्रधान मोदी पंतप्रधानपदी असणे गरजेचे असल्याचे सांगितले. पाचशे वर्षांमध्ये देशात राम मंदिर काँग्रेसने उभारले नाही. पंतप्रधान मोदी यांनी भव्य राम मंदिराचे निर्माण केले. महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर करून त्यांचा सन्मान केला असल्याचे सांगितले.
मोदी यांनी देश एकसंध करण्याचे काम केले. काश्मीरमधील ३७० कलम हटवले. काश्मीरमध्ये कधीही तिरंगा फडकला नव्हता, त्या ठिकाणी तिरंगा फडकला. विरोधकांवर हल्लाबोल करताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केवळ मोदी यांना विरोध करण्यासाठी देशातील २८ विरोधी पक्ष एकत्र आल्याचे सांगितले. जोपर्यंत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही, असे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.