ठाणे : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटामुळे महाविकास आघाडीचे सरकार जाते की राहते यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शिंदेंकडून ५० आमदारांचा पाठिंबा आपल्याला असल्याचे म्हणणे आहे. दुसरीकडे राज्यातील शिवसेनेचे (Shiv Sena) शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. आज ठाणे (Thane) जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Naresh Mhaske Resigned From Thane Shiv Sena District Chief Post)
त्यांनी ठाण्याचे महापौरपदही भूषवले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीमुळे शिवसेनेची गळचेपी होत आहे. त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा म्हस्के यांनी दिला आहे. ट्विटमध्ये नरेश म्हस्के म्हणतात, भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणी.. जात, गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना...! त्यामुळे शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच. (MaharashtraPolitics)
पण गेली अडीच वर्ष आपल्या संघटनेची राष्ट्रवादी गळचेपी चालली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नरेश म्हस्के यांनी केली. पुढे ते म्हणतात त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र !
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.