Thane News : भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून संजीव नाईक यांनी ठाणे लोकसभा लढवावी असा आग्रह केला होता. मात्र, त्यांना आपल्या नेत्याला उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे.
असे असले तरी, महायुतीचा धर्म पाळला जावून सर्वजण एकत्र कामाला लागतील असा दावा महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी केला आहे. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
ठाणे लोकसभेवरून भाजप शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरु होती. त्यात भाजप ठाणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आग्रही होती. मात्र, महाराष्ट्र दिनी शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांचे नाव जाहीर केल्यानंतर भाजपच्या गोटात एकच नाराजी पसरली आहे.
गुरुवारी सकाळी गणेश नाईक यांची भेट घेण्यासाठी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के गेले होते. यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले आदी नेते मंडळी उपस्थित होते.
त्यानंतर ठाण्यात पत्रकारांशी बोलताना, आपण नाईक यांचा आर्शिवाद घेण्यासाठी गेलो होतो, त्यांच्यासह संदीप नाईक, सागर यांची भेट घेतल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली. कार्यकर्त्यांशी कुठल्याही भेटागाठी झालेल्या नाहीत.
कार्यकर्त्यांची कुठे बैठक झाली याची माहिती नसल्याचेही ते म्हणाले. मी लहाणपणापासून नाईक यांना भेटत होतो. त्यावेळी देखील ते कौतुक करीत होते. आजही गणेश नाईक यांनी मला आर्शिवाद दिला आहे.
काही चिंता करायची गरज नाही, नवी मुंबईतून लीड मिळेल, सर्व काही मी पाहीन काही अडचण असेल तर मला सांग अशा पध्दतीने त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असल्याचेही त्यांनी सांगितले. मी साधरण, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. लोकांमधला कार्यकर्ता आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिलेली आहे. त्या संधीचे मी सोने करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.