National Commission for Safai Karamcharis : सफाई कामगारांच्या प्रश्नांचा राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने घेतला आढावा

कामगारांसाठी प्लास्टिक क्रेडिट्सची संकल्पना
National Commission for Safai Karamcharis
National Commission for Safai KaramcharisSakal
Updated on

मुंबई - महात्मा फुले आर्थिक विकास मागासवर्ग महामंडळाच्या माध्यमातून सफाई कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व्यापक स्तरावर प्रचार प्रसिद्धी करावी तसेच या योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करा असे निर्देश राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष श्री. एम वेंकटेशन यांनी दिले आहेत. (National Commission for Safai Karamcharis)

National Commission for Safai Karamcharis
Mumbai : रामनगरात जमिनीच्या वादातून एकाचा खून

राज्यातील सफाई कामगार यांचे विविध प्रश्न व अडचणींबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. वेंकटेशन, व सदस्य पी.पी.वावा यांनी आज (ता.१६ ) सह्याद्री अतिथीगृह याबाबत आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

National Commission for Safai Karamcharis
Mumbai : भंडार्ली डम्पिंग 14 गावातील ग्रामस्थ बंद पाडणार; शिंदे सरकारला पुन्हा असहकार्याची भूमिका

राज्य शासनाच्या विविध विभागाच्या वतीने सफाई कामगार यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या योजना, अनुकंपावरील वारसांना नोकरी देणे, महात्मा फुले विकास महामंडळाच्या महाप्रित कंपनीच्या योजना , 'नमस्ते' मोहिम,त्याचबरोबर हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व पुनर्वसन करणे या अधिनियमानुसार कामगारांना आधुनिक यंत्रसामग्री, साधनसामग्री पुरवणे याबाबत आयोगाने सविस्तर आढावा घेतला.

National Commission for Safai Karamcharis
Mumbai : भाईंदर येथे विषबाधेमुळे आई व मुलाचा मृत्यू

प्लास्टिक क्रेडिट

सामाजिक न्याय विभागाने सफाई कामगारांसाठी प्लास्टिक क्रेडिट चा लाभ मिळण्यासाठी हिंदुस्तान ऍग्रो या कंपनीच्या वतीने अभिनव संकल्पना राबविण्याचे निश्चित केले आहे. प्लास्टिक क्रेडिटचे फायदे हे सफाई कर्मचारी यांच्यापर्यंत कसे पारदर्शक पद्धतीने पोचवू शकतो यावर चर्चा झाली.

प्लास्टिक क्रेडिट, कार्बन क्रेडिट, आणि इतर प्रकारचे क्रेडिट या अश्या संकल्पना आहेत, ज्यामुळे प्लास्टिक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याबरोबरच पर्यावरणाला ही फायदा होणार आहे, व विशेष म्हणजे सफाई कामगारांनी जमा केलेल्या या प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यातून आर्थिक उत्पन देखील मिळणार आहे. या योजनेचेही सादरीकरण हिंदुस्तान ऍग्रो चे डॉ. भरत ढोकणे पाटील यांनी यावेळी केले.

National Commission for Safai Karamcharis
Mumbai News : उपकर प्राप्त इमारतींतील अतिक्रमणांबाबत आता पालिका आणि म्हाडाची संयुक्त पथके

यावेळी बृहन्मुंबई मनपाचे आयुक्त आय एस चहल, बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मुंबईत सफाई कामगारांकरिता करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती आयोगास दिली.

हाताने मैला साफ करणाऱ्या व या कामादरम्यान मृत्यू झालेल्या ७३ कामगारांना प्रत्येकी १० लाख रुपयाची नुकसान भरपाई वारसांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली.

सोबत राज्यात हाताने मैला उचलण्याच्या कामाला प्रतिबंध करण्यात आल्याचे सांगितले.महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाकडून यावेळी विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.