Eknath Shinde: ठाकरेंनंतर मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्लात येणार पवारांचं वादळ!

पवारांची कल्याण दौऱ्यावरील उपस्थिती: शिंदे गडावर राष्ट्रवादीचा ध्वज
Eknath Shinde sharad pawar
Eknath Shinde sharad pawar sakal
Updated on

Eknath Shinde: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी कल्याण दौऱ्यावर येत असून उल्हासनगर येथे एल्गार परिषदेत उपस्थित राहणार आहेत. पक्षाचा ताबा आणि चिन्ह गेल्यानंतर प्रथमच पवार हे कल्याण येथे येत आहेत.

Eknath Shinde sharad pawar
Eknath Shinde: वन ट्रीलियन डॉलरचे गाेल महाराष्ट्र साध्य करणार; मुख्यमंत्र्यांचा दावा

शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी ऍक्टिव्ह झालेली पहायला मिळत आहे. नुकतेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे येथे येऊन गेले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील येथे येऊन सत्ताधाऱ्यांवर काय नक्की बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी पक्षाचा ताबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला. त्यामुळे अजितदादा गटात प्रचंड जल्लोष आहे. तर शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

Eknath Shinde sharad pawar
Eknath Shinde in Kalyan: मुख्यमंत्री येणार... खड्डे बुजविण्यास सुरवात! केडीएमसीचा नेहमीचाच कित्ता

या निर्णयानंतर प्रथमच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कल्याण लोकसभा मतदारसंघात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाला पहिल्यापासूनच एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यात भाजप आणि शिंदे यांचे सरकार आले मात्र स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे कार्यकर्त्यांमध्ये फारसे पटत नसल्याची बाब यापूर्वी उघडकीस आली आहे.

खासदार डॉ. शिंदे यांना असलेला विरोध यातून पुढे आला आहे. त्यातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्पेकर यांनी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असा निर्णय दिला. हा निर्णय येताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद दौऱ्याचे आयोजन करत कल्याण लोकसभा मतदारसंघातूनच आपल्या या दौऱ्यास सुरुवात केली होती

त्यानंतरही शिवसेनेचे नेते संजय राऊत हे डोंबिवलीत आले होते तसेच दोन दोन दिवसांपूर्वीच युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील कल्याणचा दौरा केला आहे यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टिका केल्याचे पहायला मिळाले आहे.

Eknath Shinde sharad pawar
Eknath Shinde यांचे शिलेदार Deepak Kesarkar, Uddhav Thackeray यांच्यावर का संतापले?

यानंतर आता राष्ट्रवादी पक्ष हा उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रथमच कल्याण लोकसभा मतदारसंघात सोमवारी येत आहेत. कल्याण व उल्हासनगर येथील कार्यकर्त्यांची ते भेट घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सोमवारी दुपारी 4.30 वाजता कल्याण येथे स्प्रिंग टाइम क्लब येथे अध्यक्ष शरद पवार हे पदाधिकारी यांची भेट घेणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना ते कसे मार्गदर्शन करतात व काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर 5.40 वाजता उल्हासनगर मधील दसरा मैदान येथे त्यांची एल्गार परीषद होणार आहे. या परिषदेत ते उपस्थितांना काय संबोधतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde sharad pawar
CM Eknath Shinde : क्रीडा संकुलाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.