कालीचरण नौपाडा पोलिसांच्या ताब्यात; ठाणे कोर्टात करणार हजर

महात्मा गांधीजींबाबत संतापजनक वक्तव्य त्याने केल्याने नवा वाद निर्माण झाला होता.
photo
photoesakal
Updated on

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं करणाऱ्या कालीचरण महाराजाला (Kalicharan Maharaj) अखेर नौपाडा पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे. काल रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे. महात्मा गांधीजींबाबत संतापजनक वक्तव्य त्याने केल्याने नवा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे बाबाविरोधात मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड ( Dr. Jitendra Awhad) यांनी २९ डिसेंबर २०२१ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी भादवी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

photo
घानामध्ये भीषण स्फोट; १७ जणांचा मृत्यू, शेकडो इमारतींचे नुकसान

दरम्यान, याआधीही समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषणे केल्याप्रकरणी कालीचरण महाराजला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली गेली होती. (Mumbai News) कालीचरण महाराजाने 2017 मध्ये झालेल्या अकोला महापालिका निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं होतं. मात्र, कालीचरण महाराजाचा या निवडणुकीत पराभव झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अकोला (Akola) पश्चिम मतदारसंघातून त्यांच्या उमेदवाराची मोठी चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी ही निवडणूक लढवली नाही.

कालीचरण महाराज काय म्हणाला होता ?

'मुस्लिम हे राजकारणाच्या माध्यमातून देशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या डोळ्यासमोरच त्यांनी 1947 मध्ये देशावर ताबा मिळवला होता. त्यांनी प्रथम इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तसेच राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशवरही कब्जा केला आहे. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज याने केले आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

photo
T20 WC 2022 वेळापत्रक जाहीर; भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()