Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

भूमिपुत्रांच्या रेट्यामुळे व त्यांनी दाखविलेल्या एकीमुळे नवी मुंबई विमानतळाला पाटील यांचे नाव द्यायला लागले असे मत मांडले.
Navi Mumbai
Navi Mumbaisakal
Updated on

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी प्रकल्पग्रस्त लढा देत आहे. याविषयी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असल्याचे आत्तापर्यंत बोलले जात होते. परंतू ठोस असे आश्वासन काही प्रकल्पग्रस्तांना मिळत नव्हते. अखेर हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचला आहे.

विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर या विमानतळाला दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल अशी माहिती केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी डोंबिवली येथे दिली. भूमिपुत्रांच्या रेट्यामुळे व त्यांनी दाखविलेल्या एकीमुळे नवी मुंबई विमानतळाला पाटील यांचे नाव द्यायला लागले असे मत मांडले.

आगरी समाजाचे लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे अशी भूमिपुत्रांची मागणी आहे. राज्य सरकारने तसा ठराव केंद्र सरकारकडे पाठविल्याची चर्चा आहे. परंतू अजूनही अधिकृत निर्णय झालेला नाही.

Navi Mumbai
Navi Mumbai: फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले आजोबा अन् दोघा चोरट्यांनी साधला डाव

याविषयी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याशी आगरी महोत्सवाच्या मंचावर चर्चा पार पडली. या चर्चेत केंद्र शासनाची भूमिका जाणून घेण्यात आली यावेळी पाटील यांनी दि.बा. पाटील ही एकमेव अस्मिता असून, त्यांच्या नावासाठी कधी नव्हे तो आगरी समाज संघटीत झाला. या आंदोलनात आगरी समाजाबरोबरच इतर समाजातील भूमिपूत्रही सहभागी झाले. या आंदोलनातून मिळालेले दि बा पाटील यांचे नाव पृथ्वीच्या अस्तित्वापर्यंत तेवत राहील, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भूमिपूत्रांचे कौतुक केले. राज्यातील विधानसभा व विधान परिषदेत 22 नोव्हेंबर 2022 रोजी नाव देण्याचा ठराव करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला.

त्यानंतर तो नागरी उड्डाण मंत्रालयाकडून पंतप्रधान कार्यालयात पाठविण्यात आला. शासकीय नियमावली नुसार तो पॉलिटीकल क्लिअरन्ससाठी गृह विभागाकडे पाठविला गेला. त्यानंतर हा प्रस्ताव गृह विभागाकडून पंतप्रधान कार्यालयातील सचिव रोहित यादव यांच्याकडे पोचला आहे. या विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर, दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावावर शिक्कामोर्तब होईल असे सांगितले.

या चर्चेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांचाही सहभाग होता. ज्येष्ठ पत्रकार अनिकेत घमंडी यांनी यावेळी मंत्री कपिल पाटील व अध्यक्ष पाटील यांच्याशी गप्पा मारल्या. मुंबईच्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव निश्चितच मिळणार. आता फक्त तांत्रिक बाब शिल्लक आहे. माझ्या माहितीवर कोणीही अविश्वास दाखवू नये. आता हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना आंदोलन का करायचे? याबाबत कोणाला आणखी काही शंका असतील, तर सर्व माहिती देण्याची माझी तयारी आहे, असे आश्वासनही पाटील यांनी दिले.

Navi Mumbai
Navi Mumbai: मानसिक आणि अभ्यासाचा ताण वाढला म्हणून २ अल्पवयीन मुलांनी उचलले टोकाचे पाऊल

लोकसभा निवडणुकीपूर्वी विमानतळाच्या नावाची घोषणा होईल का, असा प्रश्न विचारल्यावर कपिल पाटील म्हणाले, ``भूमिपूजनावेळी 2019 मध्ये पहिले विमान उड्डाण होणार असल्याचे जाहीर झाले होते. त्यानंतर 2023 ची घोषणा झाली. आता आपण 2024 कडे जात आहोत. सद्यस्थितीत विमानतळाच्या आतापर्यंतच्या कामाची मला निश्चित माहिती नाही. जर लोकसभा निवडणुकीपूर्वी काम पूर्ण होत असेल, तर नावाची घोषणा निश्चितच होईल.''

नवी मुंबई विमानतळावर स्थानिक भूमिपूत्रांना नोकरी देण्याबाबत माजी खासदार संजीव नाईक व भूमिपूत्र संघर्ष समितीने मागणी केली आहे, या प्रश्नावर मंत्री पाटील म्हणाले, ``भूमिपूत्रांना नोकरी नाकारली जाईल, असे मला वाटत नाही. मुंबई विमानतळावरही ठाणे, पालघर आणि रायगडमधील भूमिपूत्र कार्यरत आहेत.

त्यामुळे नवी मुंबईतही भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावागावापर्यंत विकसित भारत कार्यक्रमातून सरकारी योजना पोचविल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईत भूमिपूत्रांना विमानतळावर रोजगारासाठी अडचण येणार नाही, हे निश्चित. परंतु, जर संघर्ष करावा लागला, तर आपण संघटीत आहोत, असे पाटील म्हणाले. या वेळी दशरथ पाटील यांनी विमानतळावर आवश्यक असलेल्या नोकऱ्यांसाठी भूमिपूत्रांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची विनंती पाटील यांना केली.

Navi Mumbai
Navi Mumbai: ठाणे-बेलापूर मार्गावर अवजड वाहनांना बंदी; हे आहेत पर्यायी मार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.