नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचेच नाव असेल - राज ठाकरे

राज ठाकरे
राज ठाकरे
Updated on

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन राजकारण तापलं आहे. भाजपकडून दि. बा. पाटील यांच्या नाव पुढे केलं जात आहे. तर तर महाविकास आघाडी सरकार या विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर ठाम आहे. राज ठाकरे यांनी यावर आपलं मत मांडलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचं नाव द्यायला हवं, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. बाळासाहेब आज असते तर त्यांनीही शिवरायांचंच नाव देण्याची भूमिका घेतली असती. त्यामुळे विमानतळाला छत्रपती शिवरायांचंच नाव दिलं जावं, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलं आहे.

कृती समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील बाळासाहेबांच्या नावावर ठाम असल्यानं भाजप आमदारांची बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर आज भाजपचे आमदार प्रशांत ठाकुर आणि महेश बालदी मुंबईत 'कृष्णकुंज'वर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की, नवं विमानतळ हे मुंबईच्या विमानतळाचाच भाग आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचंच नाव द्यावं. त्यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहणार आहे. या नावाला कुणीही विरोध करणार नाही.

राज ठाकरे
दिलासा! कोरोनाबळींमध्ये घट; 24 तासांत 1,422 जणांचा मृत्यू

नवी मुंबईत होत असलेलं विमानतळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचाच एक भाग आहे. त्यासाठी शिवडी-न्हावाशेव रोड तयार होत आहे. मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळेच या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहणार आहे, असं मला वाटतेय. विमानतळांना नाव देण्याचं वगैरे हे केंद्र सरकार ठरवतं. त्यामुळे आंतरराष्ठ्रीय विमानतळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच होईल. बाळासाहेब हे आदरणीय आहेत, दि बा पाटील हे ज्येष्ठ नेते होते. शिवरायांचं नाव देणंच उचित ठरणार आहे. नवी मुंबईत असले तरी विमानतळ हे मुंबई विमानतळ म्हणूनच ओळखलं जाणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे
क्रीडा प्रेमींसाठी बॅड न्यूज; साउदम्प्टनमध्ये पावसाची शक्यता

मुंबईत जागा नसल्यामुळे नवीन मुंबईमध्ये नवीन विमानतळ होतेय. त्यामुळेच त्या विमानतळालाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असेल. या विमानतळाला पूर्ण व्हायला आणखी पाच-सहा वर्ष लागतील. सध्या सुरु असलेला वाद जाणीवपूर्वक होतोय की नाही याची मला कल्पना नाही, पण आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार, हे मला वाटतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.