नवी मुंबई: चिमुकल्‍याचे अपहरण करणाऱ्यास अटक

अपहृत मुलाची सुटका; तळोजा पोलिसांनी अवघ्‍या पाच तासांत शोध
नवी मुंबई: चिमुकल्‍याचे अपहरण करणाऱ्यास अटक
sakal
Updated on

नवी मुंबई : लग्नास नकार देणाऱ्या तरुणीच्या चार वर्षाच्या भावाचे अपहरण करणाऱ्या मजिरुल मसुरुद्दीन हक्क (२५) या आरोपीला तळोजा पोलिसांनी अवघ्या ५ तासांत अटक केली. अपहरण केलेल्‍या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मसुरुद्धीन हक्क हा तळोज्‍यातील पेंधर गावात राहात असून त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या तरुणीवर (२३) तो एकतर्फी प्रेम करत होता. मसुरुद्धीनने तरुणीला लग्‍नाबाबत विचारणा केली होती. मात्र तिने नकार दिला होता. त्यानंतरही तो तरुणीच्या पाठीमागे लग्नासाठी तगादा लावून त्रास देत होता.

नवी मुंबई: चिमुकल्‍याचे अपहरण करणाऱ्यास अटक
मुंबईची प्रिती कामत सीए इंटरमीडिएटमध्ये देशात प्रथम

७ जुलै रोजी सायंकाळी तरुणी कामावरून घरी परतत असताना, तळोजा एमआयडीसीमध्ये मसुरुद्दीनने तिला अडवून लग्न करण्यास विचारणा केली. तिने नकार दिल्याने मारहाण करीत तिच्या चार वर्षीय लहान भावास पळवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. मसुरुद्दीनने शुक्रवारी दुपारी तरुणीच्या भावाचे अपहरण करून पलायन केले होते. या बाबत तरुणीने तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मसुरुद्दीनवर गुन्हा दाखल केला.

वरिष्ठ निरीक्षक काशिनाथ चव्हाण व निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करून भिवंडी, कल्याण, कुर्ला जंक्शन व सीएसटी अशा ठिकाणी रवाना केली. आरोपी भिवंडीत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक निकम व त्यांच्या पथकाने बस थांब्‍यावरून त्‍याला ताब्यात घेत मुलाची सुटका केली. - सुरेश मेंगडे, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ-१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.