ठाणे : नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) उशिरा येणाऱ्या तब्बल 191 कर्मचाऱ्यांचे वेतन (Salary) कापले आहे. विशेष म्हणजे कापण्यात आलेल्या या 191 कर्मचाऱ्यांमध्ये अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. महापालिकेने मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून ही माहिती समोर आली आहे. (Navi Mumbai Civic Body Slashes Salaries Of 191 Employees )
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात कार्यालयात एक ते तीन दिवस उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापण्यात आल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर, कार्यालयात उशिरा येणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी (Departmental Enquiry) करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
इशाऱ्यानंतरही कर्मचाऱ्यांमध्ये बदल नाही
या कारवाईबाबत बोलताना आयुक्त अभिजीत भांगर (NMMC Commissioner Abhijit Bhangar) म्हणाले की, तक्रार आल्यानंतर गेल्या महिन्यात दोन वेळा अचानक तपासणी करण्यात आली. त्यावेळी अनेक कर्मचाऱ्यांना उशिरा येण्याबद्दल कारवाईचा इशारा देण्यात आला. मात्र, त्यानंतरही अनेक कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचे भांगर यांनी सांगितले.
आयुक्त म्हणाले की, मनपाचे कर्मचारी आठवड्यातून पाच दिवस काम करतात. त्यांनी नियमांचे पालन करून वेळेवर कार्यालयात यावे. नियमांचे पालन न केल्यास आणि वेळेवर कार्यालयात न आल्यास त्याच्यावर आणखी कठोर कारवाई केली जाईल असेदेखील भांगर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.