Mumbai Crime: कोपरखैरणे पोलिसांनी कोपरखैरणेतील बालाजी एक्झॉटिका बिल्डींगसमोरील झोपडपट्टीत कोम्बींग ऑपरेशन दरम्यान गांजा विक्री करणाऱ्या तीन महिलांसह एकाला अटक केली आहे. या कारवाईत तीन लाख ६३ हजारांचा गांजा जप्त केला आहे.
कोपरखैरणे सेक्टर-९ मधील झोपडपट्टीमध्ये मोठ्याप्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अधारे कोपरखैरणे पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन करत तब्बल ३ लाख ६३ हजार ६०० रुपये किंमतीचा २० किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.
तसेच याप्रकरणी अनिल शिंदे (४५), रादुबाई काळे (४०), सीमा पवार (३३), सुरेखा शिंदे (३०) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांविरोधात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती कोपरखैरणे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.