Navi Mumbai Crime: सोने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने दागिने लुबाडले; पोलिसांकडून शोध सुरु

Jewels looted; search has been started from police: त्यानंतर सदर भामटयानी रेश्मा यांना त्यांच्या जवळ असलेली सोन्याची चैन व सोन्याची माळ गरम पाण्यात
Fraud
Fraudsakal
Updated on

Navi Mumbai: सोन्याचे दागिने चमकावण्याची पावडर विक्री करण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी घणसोली गावातील(Ghansoli village) गावदेवी मंदिराजवळ राहणाऱया एका ४० वर्षीय महिलेची दिशाभुल करुन तिची ४३ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. रबाळे पोलिसांनी(Rabale Police) या घटनेतील दोघा भामटयाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

Fraud
Nanded Crime : सावरखेड ,नांदेड येथील अकरावर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार व खून ; नराधमास फाशीची शिक्षा

या प्रकणात फसवणूक झालेल्या महिलेचे नाव रेश्मा देसाई (४०) असे असून त्या घणसोलीतील गावदेवी मंदिराजवळ कुटुंबासह रहाण्यास आहेत. गत मंगळवारी १६ जानेवारी रोजी रेश्मा आपल्या घरामध्ये एकटयाच असताना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दोघे भामटे पितळीची भांडी व सोने चमकावण्याची पॉलीश पावडर(Polish powder) विक्री करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घराजवळ गेले होते.

सदर भामटयानी पावडरची सॅम्पल बघितल्यानंतर त्यांची पावडर विकत घेण्याची गळ रेश्मा यांना घातली. त्यासाठी रेश्मा यांनी तयारी दर्शविल्यानंतर दोघा भामटयानी त्यांना झाकणासह एका स्टिलच्या डब्यात गरम पाणी करुन हळद घेऊन येण्यास सांगितले.

सदर वस्तु आणल्यानंतर भामटयानी हळद व त्यांच्याजवळ असलेली लाल रंगाची पावडर स्टीलच्या डब्यातील गरम पाण्यात टाकुन ती मिक्स केली. त्यानंतर सदर भामटयानी रेश्मा यांना त्यांच्या जवळ असलेली सोन्याची चैन व सोन्याची माळ गरम पाण्यात टाकण्यास सांगितले.

Fraud
Sambhaji Nagar Crime : पोलिसांच्या सर्च मोहिमेमुळे वाचला बहीण-भावाचा जीव

त्यानंतर सदर भामटयानी रेश्माला बोलण्यात गुंतवून स्टीलच्या डब्यात टाकलेले दागिने हातचलाखीने काढुन घेत, स्टीलच्या डब्याला झाकण लावून तो डबा त्यांच्याकडे दिला. तसेच डब्यातील पाणी आणखी गरम करुन पंधरा मिनीटाने डब्याचे झाकण उघडण्यास सांगून दोघा भामटयानी त्याठिकाणावरुन पळ काढला.

काही वेळानंतर रेश्मा यांनी डब्यातील पाणी गरम करुन सदर डबा उघडला असता, त्यामध्ये सोन्याचे दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर दोघा भामटयानी दागिने पॉलीश करुन देण्याच्या बहाण्याने त्यांचे ४३ हजार रुपये किंमतीचे दागिने घेऊन पलायन केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर रेश्मा यांनी बिल्डींगच्या खाली जाऊन दोघा भामटयाचा शोध घेतला असता, ते पळून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी रबाळे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

Fraud
Mumbai Pune Express Way: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे गुरूवारी पाच तास बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.