Navi Mumbai Crime : वाशीमध्ये रिक्षाच्या धडकेत पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Crime News: वाशी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Navi Mumbai Crime : वाशीमध्ये रिक्षाच्या धडकेत पोलीस कॉन्स्टेबल जखमी
Updated on

Latest Navi Mumbai News: वाशी येथून मानखुर्दच्या दिशेने जाणाऱया भरधाव रिक्षाने बिट मार्शल पोलिसाच्या मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरील पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री वाशी खाडी पुलाजवळ घडली.

पोलिसाला धडक देणारा रिक्षा चालक दारुच्या नशेत असल्याचे त्याच्या तपासणीत आढळून आले असून या अपघातात त्याच्या डोक्याला सुद्धा जखम झाली आहे. वाशी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.