Navi Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई, मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर लुटमारी करणारी टोळी अटकेत!

latest Mumbai Pune Express Way News: पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 व खालापुर येथे 1 असे जबरी चोरीचे व दरोडÎाचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
Navi Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई, मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर लुटमारी करणारी टोळी अटकेत!
Updated on

Latest Panvel News: मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर लघुशंकेसाठी थांबलेल्या ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवुन त्याला बेदम मारहाण करुन लुटणाऱया टोळीतील 5 लुटारुंना पकडण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे.

या टोळीतील इतर 3 आरोपी अद्याप फरार असुन पोलिसांकडुन त्यांचा शोध घेण्यात येत आहे. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना पोलिसांनी सदर गुह्याचा तांत्रिक व गोपनिय माहितीद्वारे तपास करुन महामार्गावर लुटमारी करणाऱया टोळीला अटक केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. पोलिसांनी या आरोपींकडुन 5 मोबाईल फोन व रोख रक्कम असा सुमारे 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.