Navi Mumbai Crime: चायनिज दुकानात काम करता करता विकत होता अमली पदार्थ, पोलिसांनी केली अटक!

Crime: सेंटरमध्ये एक व्यक्ती तेथे येणाऱया लोकांना छोटी पुडी देऊन त्यांच्याकडुन पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले.
Navi Mumbai Crime: चायनिज दुकानात काम करता करता विकत होता अमली पदार्थ, पोलिसांनी केली अटक!
Updated on

latest Navi Mumbai News: तळवळी येथील चायनिज दुकानात काम करतानाच अमली पदार्थाची विक्री करणाऱया एका व्यक्तीला अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी रात्री गस्ती दरम्यान अटक केली आहे. मयुर तानाजी सुपुगडे (३०) असे या व्यक्तीचे नाव असून अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्या ताब्यातून अडीच लाख रुपये किंमतीचा १० ग्रॅम वजनाच्या हेरॉईन या अमली पदार्थाच्या ६७ पुड्या जप्त केल्या आहेत.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडू व त्यांचे पथक सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गस्त करण्यासाठी बाहेर पडले होते. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अमली पदार्थ विरोधी पथक नोसील नाका येथून तळवली गावाकडे जात असताना, तळवली गाव येथील जय भवानी चायनिज सेंटरमध्ये एक व्यक्ती तेथे येणाऱया लोकांना छोटी पुडी देऊन त्यांच्याकडुन पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले.

Navi Mumbai Crime: चायनिज दुकानात काम करता करता विकत होता अमली पदार्थ, पोलिसांनी केली अटक!
Navi Mumbai Accident: ट्रेलरच्या धडकेत स्कुटीवरील 2 वर्षीय बालकाचा मृत्यू , इतर तिघे जखमी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.