Navi Mumbai Crime: ३ किलो ८० ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने घेवून मालक झाला फरार; वाचा संपूर्ण बातमी

Crime News
Crime Newssakal
Updated on

सोन्याचे दागिने बनवून देणाऱ्या मुंबईतील झवेरी बाजारातील एका ज्वेलर्स मालकाने पनवेलमधील दोन ज्वेलर्स शॉप चालकांनी बनवण्यासाठी दिलेले तब्बल १ कोटी ९० लाख रुपये किमतीचे ३ किलो ८० ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने घेऊन फरारी झाला आहे. रंजितसिंग भवरसिंग सिसोदिया असे या ज्वेलर्स व्यावसायिकाचे नाव असून कामोठे पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल आहे.

Crime News
Navi Mumbai Crime: हद्दपार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; गस्ती पथकाने पकडले

कामोठे येथील जय माता गोल्ड शॉपचे मालक बाबा कोळेकर (३१) यांना ऑक्टोबरमध्ये कर्नाटक बेळगाव येथील एका ग्राहकाने सोन्याचे दागिने बनवण्यासाठी १ किलो ८० ग्रॅम वजनाचे शुद्ध सोन्याची लगड दिली होती. कोळेकर यांनी मुंबईतील झवेरी बाजार येथील कोमल ज्वेलर्सचा मालक रंजित सिसोदिया याला यापासून दागिने बनवून देण्याची ऑर्डर दिली होती.

त्यानुसार कामोठे येथील ज्वेलर्स शॉपमधून १ किलो ८० ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याची लगड देण्यात आली होती, पण सायंकाळी पाच वाजता रंजित सिसोदियासोबत काम करणाऱ्या भवरसिंग याने कोळेकर यांना दिल्ली येथील डीआरआयचा (महसूल गुप्तचर संचालनालय) छापा पडल्याचे सांगत सर्व दागिने जप्त केल्याचे सांगितले.

Crime News
Navi Mumbai: तळोज्याकरांसाठी आनंदवार्ता; विविध विकासकामांसाठी भूखंड मंजूर!

त्यामुळे कोळेकर यांनी त्याच्याकडे असलेले ओरिजनल बिल घेऊन येत असल्याचे सांगितल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच शॉप बंद करून पलायन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कोळेकर यांनी आजूबाजूच्या व्यापाऱ्यांकडे चौकशी केली असता फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे.

करंजाडेतून एकाची फसवणूक
रंजित सिसोदिया याने पनवेलमधील करंजाडे येथील सचिन वाघमोडे यांच्याकडूनदेखील दागिने बनवण्यासाठी घेतलेले ५०० ग्रॅम वजनाचे सोने घेऊन पलायन केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने तब्बल १ कोटी ९० लाख रुपये किमतीचे ३ किलो ८० ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याचे लगड चोरल्याप्रकरणी कोळेकर यांनी कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Crime News
Navi Mumbai: दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने डिलीव्हरी बॉयचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.