नवी मुंबईत १२ नोव्हेंबरपासून युवक काँग्रेसच्या निवडणुका

Indian youth congress
Indian youth congresssakal media
Updated on

घणसोली : नवी मुंबईसह (navi mumbai) संपूर्ण राज्यात युवक काँग्रेसच्या (yuvak congress) अंतर्गत निवडणुकांची घोषणा (election announcement) गुरुवारी नवी मुंबईत निवडणूक प्रभारी मुकुल गुप्ता (mukul Gupta) यांनी वाशी काँग्रेस भवन (vashi congress bhavan) येथे केली. या निवडणुका अध्यक्षपदासह इतर सर्वच पदांसाठी होणार आहेत. २७ ऑक्टोबरपासून सदस्य अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून युवकांना राजकारणात संधी देणार (opportunity for youngsters) असल्याची माहिती युवक काँग्रेसतर्फे देण्यात आली.

Indian youth congress
अखेर 'मन्नत' पूर्ण, आर्यन खान तुरुंगातून सुटला

नवी मुंबई युवक काँग्रेसतर्फे लढवण्यात येणाऱ्या अंतर्गत निवडणुकांसंबंधी बिगुल वाजले आहे. १२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या निवडणुकांसाठी तरुण कार्यकर्त्यांनी पुढे येण्याचे आवाहन युवक काँग्रेसमार्फत केले आहे. खासदार राहुल गांधी यांच्या लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन सर्वसामान्य घरातील युवकांना संधी देण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

निवडणूक लढवायची आहे अशांनी उमेदवारी अर्ज भरून सहभाग नोंदवावा. उमेदवारीबाबत हरकत आल्यास ७ नोव्हेंबरपासून १२ नोव्हेंबरपर्यंत हरकत नोंदवू शकता, असे मुकुल गुप्ता यांनी स्पष्ट केले. या वेळी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुबीन बाबू थॉमस, उपाध्यक्ष मृणाल मानधणे, सरचिटणीस सुदर्शन नितीन सावंत, अश्विन भोर, स्वप्नील म्हात्रे, नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()