Navi Mumbai Crime: शाळकरी मुलीची इन्स्टाग्रामवर बदनामी, अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल

Panvel Instagram Crime: पीडित मुलीचे अश्‍लील फोटो तयार करून ते शाळेच्या इन्स्टाग्राम ग्रुपवर व्हायरल केले.
Navi Mumbai Crime: शाळकरी मुलीची इन्स्टाग्रामवर बदनामी, अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल
Updated on

Panvel Crime Update: पनवेल भागात राहणाऱ्या व १२ वीत शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांनी एका १५ वर्षीय शाळकरी मुलीचे मॉर्फिंग करून तयार केलेले अश्‍लील फोटो शाळेच्या इन्स्टाग्राम ग्रुपवर टाकुन व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणातील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील १५ वर्षीय शाळकरी पीडित मुलगी पनवेल भागात रहाण्यास असून सध्या ती शिक्षण घेत आहे. पीडित मुलीने काही महिन्यांपूर्वी आपल्या नावाने इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केले होते. या अकाऊंटवरील पीडित मुलीचे फोटो पनवेलच्या नेरेगावात राहणाऱ्या व १२ वीत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने चोरले. त्यानंतर त्याने मॉर्फ करून पीडित मुलीचे अश्‍लील फोटो तयार करून ते शाळेच्या इन्स्टाग्राम ग्रुपवर व्हायरल केले.

Navi Mumbai Crime: शाळकरी मुलीची इन्स्टाग्रामवर बदनामी, अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल
Navi Mumbai News: घाटावरील नेत्याचे ‘मिशन नवी मुंबई’; 'या' कारणांसाठी आहे मतदारांवर जास्तीच लक्ष!

त्यानंतर पनवेलच्या करंजाडे भागात राहणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यानेदेखील पीडित मुलीचे मॉर्फ केलेले अश्‍लील फोटो समाजमाध्यमांवरून व्हायरल केले. दरम्यान, पीडित मुलीचे व्हायरल झालेले अश्‍लील फोटो तिच्या मैत्रिणीच्या निदर्शनास आल्यानंतर तिने मुलीला त्याबाबत माहिती दिली. त्यामुळे पीडित मुलीने पनवेल तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Navi Mumbai Crime: शाळकरी मुलीची इन्स्टाग्रामवर बदनामी, अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल
Navi Mumbai: अत्याचारानंतर व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर, ६ वर्षीय चिमुकलीसोबत जे घडलं ते ऐकून सारेच हादरले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.