मॉल आणि रेस्टॉरंटकडून बेशिस्तीचे दर्शन, तब्बल साडे तीन लाखांचा दंड वसूल

मॉल आणि रेस्टॉरंटकडून बेशिस्तीचे दर्शन, तब्बल साडे तीन लाखांचा दंड वसूल

Published on

मुंबई: शहरात कोविडबाधित रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत असताना मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट व्यवस्थापनांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. वाशी आणि सीवूड्‌स येथील मॉलमध्ये तपासण्याचे अहवाल न घेताच ग्राहकांना सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी केलेल्या अचानक पाहणीत ही गंभीर बाब उघडकीस आली. तसेच रात्री मनाई असतानाही सुरू असणाऱ्या 7 बार आणि रेस्टॉरंटवर पालिकेने कारवाई केली.

कोविड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी महापालिकेतर्फे 31 दक्षता पथकांमधील 5 पथके रात्रीच्या वेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाया करत आहेत. त्यांच्यासोबत कारवाईसाठी पोलिस कर्मचारी देण्यात आले आहेत. 27 मार्चलाही बेलापूर, नेरूळ, सानपाडा, कोपरखैरणे भागत रात्री वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या 7 रेस्टॉरंटवर धाडी टाकून कारवाई करण्यात आली. या बारकडून प्रत्येकी 50 हजारप्रमाणे एकूण 3 लाख 50 हजार इतक्‍या रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला. सेक्‍टर 8 नेरूळ येथील कल्पना बार, साई हॉटेल अँड बार, पोटोबा फास्ट फूड तसेच बेलापूर येथील रूड लंग बार, सानपाडा येथील कृष्णा रेस्टॉरंट तसेच कोपरखैरणे येथील क्‍लासिक रेस्टॉरंट अँड बार आणि समुद्र रेस्टॉरंट अँड बार अशा 7 व्यवस्थापनाचा समावेश आहे. 

कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवड्याच्या अखेरीस मॉलमध्ये नागरिकांची मोठ्या संख्येने असलेली संख्या नियंत्रणात आणणे आणि नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने शुक्रवारी 4 वाजल्यापासून शनिवार आणि रविवार पूर्ण दिवस मॉलच्या प्रवेशव्दाराजवळ अँटिजेन टेस्ट करण्यास 26 मार्चपासून सुरुवात झाली आहे. याबाबत पडताळणीसाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सीवूड नेरूळ येथील ग्रॅंड सेंट्रल मॉल तसेच वाशी येथील इनॉर्बिट मॉलला अचानक भेट दिली. तेव्हा याठिकाणी अँटिजेन चाचणी आणि अहवालाची विचारणा केल्याशिवाय नागरिकांना प्रवेश दिला जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार विशेष दक्षता पथकांमार्फत कार्यवाही करत ग्रॅंड सेंट्रल मॉल आणि इनॉर्बिट मॉल या दोन्ही मॉल व्यवस्थापनांकडून प्रत्येकी 50 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Navi mumbai malls and restaurants fined Rs 3.5 lakh

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.