Navi Mumbai Metro: उद्घाटनाविनाच नवी मुंबईच्या मेट्रोला हिरवा कंदील; आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, पाच महिने...?

नवी मुंबईच्या मेट्रो सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
Aditya Thackeray slam cm eknath shinde over Maharashtra Karnataka dispute political news
Aditya Thackeray slam cm eknath shinde over Maharashtra Karnataka dispute political news esakal
Updated on

नवी मुंबई मेट्रो सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळं उद्घाटनाविनाच ही मेट्रो सुरु झाली आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. या आदेशानंतर लगेचच आदित्य ठाकरेंनी ट्विट करुन याबाबत खुलासा केला आहे. (Navi Mumbai Metro started without innauguration Aditya Thackeray targets CM Eknath Shinde)

आदित्य ठाकरेंनी काय म्हटलंय?

आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलं की, "माझ्या कालच्या आणि पूर्वीच्या ट्विटचा आणखी परिणाम पहायला मिळाला आहे. नवी मुंबई मेट्रो उद्घाटनासाठी 5 महिन्यांपासून तयार आहे. पण खोके सरकारच्या नेत्यांना उद्घाटनासाठी वेळ नाही, असं ट्विट मी केलं होतं. आज मुख्यमंत्र्यांनी उद्यापासून मेट्रो सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत" (Latest Marathi News)

Aditya Thackeray slam cm eknath shinde over Maharashtra Karnataka dispute political news
Navi Mumbai Metro : उद्घाटनाविनाच धावणार नवी मुंबईची मेट्रो; मुख्यमंत्र्यांचे आदेश

यांच्यासाठी जनता शेवटी

मी यासंदर्भात एकच मागणी केली होती की या बेकायदेशीर सरकारच्या मंत्र्यांना लोकांसाठी वेळ नसेल तर त्यांनी तात्काळ मेट्रो लोकांसाठी खुली करावी. सध्याच्या शिंदे-फडणवीसांच्या राजवटीत तसेच ज्यांनी राज्यात बेकायदेशीरपणे सरकारी पदांवर कब्जा केला आहे ते स्वतःला प्रथम, पक्ष नंतर आणि जनता शेवटची असल्याचं म्हटलं आहे.

राज्यात राजकीय प्रचारासाठी त्यांच्याकडं वेळ आहे पण नवी मुंबई मेट्रो 5 महिन्यांपासून तयार असताना ती सुरू करायला वेळ नाही, असा आरोपही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.