नवी मुंबईत पावसाची संततधार सुरुच

heavy rainfall
heavy rainfallsakal media
Updated on

वाशी : अनंतचतुर्दशीपासून सुरू झालेल्‍या संततधार पावसामुळे (heavy rainfall) वातावरणात गारवा निर्माण (cool temperature) झाला आहे. गेल्‍या काही दिवसांपासून शहरात उन-पावसाचा खेळ सुरू होता. कधी उन तर क्षणात ढग दाटून येत असल्‍याने नागरिकांच्या आरोग्‍याच्या (people health issues) व्याधी वाढल्‍या आहेत. मात्र दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्‍या संततधारेमुळे खड्‌डेमय रस्‍त्‍यातून (potholes on road) मार्गक्रमण होताना नागरिकांसह चालकांना चांगलीच कसरत करावी लागते.

heavy rainfall
कल्याण-डोंबिवलीत 540 गरोदर महिलांचे कोरोना लसीकरण

गणेशोत्वसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पावसाने जोर धरल्‍याने बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांचे अक्षरक्षा कंबरडे मोडले आहे. सोमवारी सकाळी ८.३० वाजल्यापसून मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यत नवी मुंबई पालिका क्षेत्रात ३७.१८ मिमी पाऊसांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत सरासरी तीन हजार मिलिमीटर पाऊसांची नोंद झाली आहे. तर संततधारेमुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले होते. ऑगस्ट महिन्यांच्या अखेरपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढली होता. पावसाने पुन्हा जोर धरल्‍याने वातावरणात गारवा निर्माण झाल्‍याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.