मुंबईः राज्य सरकारनं बुधवारपासून शहरातील मॉल पाच महिन्यानंतर उघडण्यास परवानगी देण्यात आली. मात्र नवी मुंबई महापालिकेनं या निर्णयापासून यू टर्न घेतला आहे. नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)नं गुरुवारी अचानकपणे मॉल पुन्हा सुरू करण्याबाबत आपलं मत बदललं आहे. पालिकेनं मॉल सुरु झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला. शहरात एकूण छोटे, मोठे 11 मॉल्स आहेत. मॉल सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानं शॉप मालकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र, हा आनंद केवळ एकच दिवस टिकला.
नवी मुंबई आयुक्त अभिजीत बांगर यांनी दुसऱ्याच दिवशी मॉल बंद करण्याचे आदेश दिलेत. मॉलमध्ये गर्दी होत असल्याचं सांगत त्यांनी हा निर्णय घेतला. जर लोकांना बंद जागांवर एकत्र जमण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कोविड-१९ची प्रकरणं वाढण्याची भीती आहे, असं पालिकेनं म्हटलं आहे.
कडक उपाययोजना आणि ग्राहकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचनांसह राज्य सरकारच्या 'मिशन बिगिन अगेन' च्या ताज्या टप्प्यातील भाग म्हणून बुधवारी मॉल पुन्हा सुरू झाले. पालिकेनं ३१ जुलैला सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत मॉल्सला काही स्टोअर आणि रेस्टॉरंट्स चालविण्यास परवानगी देण्याचा आदेश दिला होता.
पाच महिन्यांनंतर बुधवारी अखेर मॉल्सचे दरवाजे उघडले. मात्र मुसळधार पावसामुळे काहीच जणांनी मॉलला भेट दिली. मात्र पुढील काही दिवसात गोष्टी सुधारण्याची प्रतीक्षेत असणारे मॉल्स चालकांना आनंदावर पाणी फिरलं आहे. दरम्यान मॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंग बरोबर सॅनिटायझर, टेम्प्रेचर गन, आयसोलेशन रूमची व्यवस्था करण्यात आली होती. मॉलमध्ये प्रवेश केलेली आणि बाहेर पडलेल्या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी सेन्सर मशीनही बसविण्यात आल्या आहेत. एनएमएमसीने गुरुवारी पुढील आदेश येईपर्यंत मॉल पुन्हा बंद ठेवण्याचा नवीन आदेश दिला. त्यामुळे नवी मुंबईत पुढील आदेश येईपर्यंत मॉल बंद राहतील.
नवी मुंबई पालिका आक्रमकपणे संसर्गजन्य आजाराशी लढा देत आहे. अलीकडेच नवी मुंबई शहरातील परिस्थितीत सकारात्मक बदल घडत आहे. बुधवारी, १,१३३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. तसंच, कोरोना व्हायरससाठी सकारात्मक चाचणी घेणाऱ्यांची संख्या कमी झाली असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.
Navi Mumbai Municipal Corporation malls shut down again
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.