तुर्भे : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर (Omicron Variant) दिवसातून तीन ते चार वेळा शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे (Public toilets) निर्जंतुकीकरण (sanitization) करण्यात यावे, अशी मागणी नालंदा बुद्ध विहार संस्थेकडून (Nalanda buddha vihar organization) नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर (Abhijit bangar) यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाच्या अथक प्रयत्नामुळे नवी मुंबई शहरात कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. आता नव्याने ओमिक्रॉनचे संकट निर्माण झालेले आहे. ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला नसला, तरी पालिका प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. नवी मुंबईतील गावांमध्ये, कॉलनी, झोपडपट्टी, चाळी, खाण परिसरात, एमआयडीसीमध्ये, महापालिका उद्यान आणि क्रीडांगणाच्या सभोवताली मोठ्या संख्येने सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. गाव, चाळीत भाडेकरू अथवा सभोवतालचे रहिवासी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा स्नानासाठी व शौचासाठी वापर करतात.
उद्यान व क्रीडांगणात सकाळी फिरावयास येणारे नागरिक, रस्त्यावरून जाणारे पादचारीही स्वच्छतागृहांचा वापर करत असतात. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दिवसातून तीन ते चार वेळा निर्जंतुकीकरण होणे आवश्यक आहे. मुंबई महापालिका प्रशासन काही महिन्यांपासून सातत्याने सार्वजनिक स्वच्छतागृहांचे निर्जंतुकीकरण दिवसातून पाच वेळा करत आहे. त्यामुळे धारावीसारख्या झोपडपट्टी परिसरातही कोरोना आटोक्यात आला आहे.
ओमिक्रॉनचे सावट पाहता त्या ठिकाणी आजही सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये दिवसातून पाच वेळा निर्जंतुकीकरण केले जात आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनानेही शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये दिवसातून तीन ते चार वेळा निर्जंतुकीकरण करण्याची विशेष मोहमी राबवण्याची मागणी नालंदा बुद्ध विहार संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.