Navi Mumbai: नवी मुंबई झाले हागणदारीमुक्त शहर; तब्बल 'इतक्या' हजार सौचालयाचे बांधकाम!

Navi Mumbai
Navi Mumbaiesakal
Updated on

Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हागणदारीमुक्त शहर आणि प्रभाग करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आहे. पालिका, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून घरगुती शौचालय योजना आणि शलटर संस्थेच्या माध्यमातून २०१६ पासून पाच हजार ८७९ घरगुती शौचालये बांधली आहेत. त्यामुळे नवी मुंबई हे हागणदारीमुक्त शहर झाले आहे.

Navi Mumbai
Navi Mumbai : नवी मुंबई होणार अतिक्रमण मुक्त च उपायुक्तांनी काढले हे आदेश!

हागणदारीमुक्त शहराबाबत पालिकेकडून सातत्याने जनजागृती करण्यात येते. पालिकेच्या या जनजागृतीला यश येऊन दररोज पालिकेकडे शौचालय उभारणीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या वाढत आहे. केंद्र सरकारतर्फे देशभरात स्वच्छ भारत मिशन राबवण्यात येत आहे.

याअंतर्गत आयएचएचएल योजनेतून घरगुती शौचालये बांधण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून १२ हजार रुपये व पालिकेकडून पाच हजार रुपये असे १७ हजार रुपये अदा करण्यात येते. या योजनेतून नवी मुंबई शहरातील झोपडपट्टी व गावठाण तसेच चाळींमध्ये आतापर्यंत तीन हजार ७३० नागरिकांनी घरांमध्ये शौचालयांची उभारणी केली आहे; तर शलटर या संस्थेकडून दोन हजार १३९ शौचालये उभारण्यात आली आहेत. ही संस्था बांधकामाचा खर्च करत आहे.

स्मार्ट सिटी नवी मुंबई शहरात नवनवीन प्रकल्पांची भर पडत असून हागणदारीमुक्त संकल्पनेनंतर महापालिकेने शौचालयाच्या उपक्रमावर भर देत ई-टॉयलेट उभारले आहेत; तर अपंगांसाठी विशेष स्वच्छतागृह व शौचालय उभारली आहेत. देशपातळीवर नावाजलेल्या मुंबई शहराच्या नावीन्यपूर्ण उपक्रमात आणखीन एक भर पडली आहे. आता नवी मुंबई शहरात पालिकेने पदरचा एकही रुपया खर्च न करता सामाजिक संस्थांच्या सीएसआर फंडातून वातानुकूलित शौचालय तुर्भे येथे वर्षभरापूर्वी उभारले आहे.

Navi Mumbai
Modi In Navi Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवी मुंबई दौरा ठरला; असं असणार वेळापत्रक!

झोपडपट्टी भागात मलनिस्सारण वाहिन्या

दिघा ते रबाळे एमआयडीसी परिसर, ऐरोली समतानगर ते ऐरोली गाव, तुर्भे स्टोर व तुर्भे नाका, सीबीडी येथील रमाबाईनगर, नेरूळ एलपी शिवाजीनगर या झोपडपट्टी परिसरात घरोघरी शौचालय उपक्रम अधिक गतिमान करण्यात येत आहे. त्या अनुषगाने अनेक ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत नियोजनबद्ध घरोघरी शौचालय उपक्रम १०० टक्के पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात वैयक्तिक घरगुती शौचालय योजनेंतर्गत पाच हजार ८७९ जणांनी लाभ घेतला असून शहर हगणदारीमुक्त झालेले आहे. त्यामुळे नवी मुंबईला स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम क्रमांकावर येत आहे.

- बाळासाहेब रांजळे, उपायुक्त, महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग

Navi Mumbai
Navi Mumbai Crime News : एका तासात दोन महिलांचे १ लाख ३५ हजाराचे दागिने लुबाडले !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.