नवी मुंबईकरांनो सावधान; तुमच्यावर घोंगावतंय एक मोठं संकट, खाडी परिसर आहे हॉटस्पॉट

नवी मुंबईकरांनो सावधान; तुमच्यावर घोंगावतंय एक मोठं संकट, खाडी परिसर आहे हॉटस्पॉट
Updated on

नवी मुंबई, तुर्भे : मच्छरांच्या वाढत्या उत्पत्तीवर प्रतिबंध येण्यासाठी नवी मुंबई पालिकेकडून खास व्यवस्था केलेली असते. परंतु, ही व्यवस्था करूनही परिसरात डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यास पालिकेल अपयश आले आहे. यामुळे नागरिकांना दिवसाही डासांच्या भुणभुणीचा सामना करावा लागत आहे. यात डासांसाठी असणाऱ्या औषधांबाबत नागरिक संशय घेऊ लागले आहेत. आयुक्तांनी या औषधांविषयी चौकशी करावी, अशी मागणी शिरवणे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. 

नवी मुंबईमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मलेरिया कामगारांची नियुक्ती केली आहे. त्यांना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना मिळाल्यानंतर त्यानुसार नवी मुंबई परिसरात फवारणी करतात. परंतु, तरीही डासांचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता तर दिवसाही नागरिकांना डासांचा त्रास होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

सध्या स्वच्छता अभियानाचे नारे सुरू आहेत. त्यामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असेल, तर स्वच्छता अभियानावर शंका येते. त्यामुळे आयुक्तांनी सध्या वापरण्यात येत असलेल्या औषधांची चौकशी करावी. त्यानंतर सत्य बाहेर येईल. 
- महेश पाटील, शिरवणे ग्रामविकास मंडळ (अध्यक्ष)  

नवी मुंबई शहराशेजारी असलेली खाडी ही एक डासांची पैदास असणारे ठिकाण आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात सुरू असणारी अनधिकृत बांधकामे, उघडी गटारे, मलनि:सारण वाहिन्या हे सुद्धा एक कारण बनले आहेत. या ठिकाणी मलेरिया कामगार डासांची पैदास होणारी ठिकाणे शोधून कारवाई करतात; मात्र त्यांच्याकडे असलेल्या औषधांचा अपेक्षित परिणाम होत नाही. याबाबत नवी मुंबई पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. धनवंती घडगे यांच्याशी संपर्क केला, मात्र होऊ शकला नाही. 

navi mumbai news amount of mosquitoes increasing at rapid pace at navi mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.