महागृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांची डोकेदुखी वाढली; सिडको लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

महागृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांची डोकेदुखी वाढली; सिडको लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
Updated on

वाशी : सिडकोच्या वतीने ऑगस्ट 2018 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरीता घणसोली, खारघर, कळंबोली, द्रोणागिरी व तळोजा या ठिकाणी महागृहनिर्माण योजनेअंतर्गत 14 हजार 838 घरांची लॉटरी काढण्यात आली होती. या घरांच्या लाभार्थींना ऑक्‍टोबर 2020 मध्ये पहिल्या टप्प्यातील अकरा हजार घरांना ताबा देण्यात येणार होता.

मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन लागू झाल्यानंतर बांधकाम ठप्प झाले होते. त्यामुळे रेराने देखील इमारतीचे बांधाकाम होण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होते. सहा महिने मुदत वाढ दिल्यानंतर एप्रिल अखेर घरांचा ताबा मिळणार, अशी आशा गृहलाभार्थीना होती.

परंतु महितीच्या अधिकारांत, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेचे काम सुरू असून जून 2021 पर्यंत ताबा मिळण्याची शक्‍यता असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिडको लाभार्थीची डोकेदुखी वाढली असून लाभार्थीचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. 

सिडकोने घणसोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी व कळंबोली या भागामध्ये आर्थिकदृष्टया दुर्बल व अल्प घटकांकरीता 14 हजार 838 घरांची महागृहनिर्माण योजना अडीच वर्षांपूर्वी जाहीर केली होती. या गृहप्रकल्पातील घरांचा ताबा हा रेरा कायद्यानुसार नुसार ऑक्‍टोबर 2020 ते मार्च 2021 मध्ये टप्याटप्याने देण्यात येणार होता.

मात्र कोरोना महामारी आणि देशात लॉकडाऊन लागू केल्यानंतर प्रकल्पाचे काम रखडले. त्यातच रेराने देखील बांधकाम व्यावसायिकांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली, मात्र आता जून 2021 पर्यंत घरांचा ताबा मिळणार असल्याचे सिडकोकडून माहिती अधिकारात स्पष्ट करण्यात आल्याने लाभार्थी चिंतेत आहेत. 

सिडकोच्या घरांसाठी पहिला हप्ता भरण्यासाठी कर्ज काढले होते. त्यातच बॅकेचे गृहकर्ज घेऊन त्यांचे हप्ते देखील सुरू झाले आहेत. कोरोना काळापासून पगारातही कपात झाली आहे. त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडले आहे. सिडकोचे घर मिळाल्याने घरांचे स्वप्न पूर्ण होणार, असे वाटले होते. पण आता घर लागल्यामुळे आनंद कमी आणि डोकेदुखी, आर्थिक कोंडी वाढली आहे.  - विकास रावडे, लाभार्थी 

सिडकोने ऑक्‍टोबर 2019 पासून जून 2021 पर्यंत सहा समान हप्त्यामध्ये पैसे भरण्यास सांगितले होते. कोरोना काळातही लाभार्थीकडून सिडकोने पैसे वसूल केले. पाच हजारांपेक्षा जास्त लाभार्थीने सिडकोकडे वेळेत पैसे दिले आहे. पण घरांचा ताबा न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा पडत आहे. 

अनेकांनी गृह कर्ज घेतल्यामुळे त्यांचा घरांचा हप्ता सुरू झाला आहे. तर भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे भाडे देखील भरावे लागत आहे. त्यामुळे लाभार्थी आर्थिक विवंचनेत अडकले आहे. सिडकोने दिलेल्या वेळेत दंडाच्या रक्कमेसह अनेकांनी कर्ज काढून वेळेत हप्ते भरले आहे.

त्यामुळे लवकरात लवकर घरांचा ताबा देण्यात यावा, अशी मागणी लाभार्थींकडून होत आहे. यासंदर्भात सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.  

navi mumbai news cidco lottery winner will have to wait till june possession delayed
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.