फ्लेमिंगो पक्ष्यांचे विलोभनीय दृश्‍य; नेरूळ खाडीकिनाऱ्यावर पक्षीप्रेमींची गर्दी

फ्लेमिंगो पक्ष्यांचे विलोभनीय दृश्‍य; नेरूळ खाडीकिनाऱ्यावर पक्षीप्रेमींची गर्दी
Updated on

खारघर  : नेरूळ एनआरआय खाडीकिनारा सध्या फ्लेमिंगोंनी फुलून गेला आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच या पक्ष्यांचे स्थलांतर सुरू होते. दर वर्षी डिसेंबरअखेरीस वा जानेवारीत लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो खाडीकिनारी येतात. या ठिकाणी चार महिने त्यांचे वास्तव्य असते. पक्ष्यांचे विलोभनीय दृश्‍य, हालचाली टिपण्यासाठी पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने खाडीकिनारी येतात. 

थंडी सुरू होताच नवी मुंबई, खारघर खाडीकिनारी युरोपमधील सायबेरियातील फ्लेमिंगो येत असतात आणि मार्चअखेरपर्यंत त्यांचा मुक्‍काम असतो. तापमान वाढताच ते मायदेशी परततात. नेरूळ एनआरआय खाडीकिनाऱ्यावर सध्या फ्लेमिंगो दाखल झाले असून त्यांना पाहण्यासाठी पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांची गर्दी होत आहे. फ्लेमिंगोला रोहित किंवा हंस हे पारंपरिक नाव आहे. खाडीकिनाऱ्यावर पहाटे भरती येण्यापूर्वी खाद्यासाठी दीड ते दोन तास असतात. पक्ष्यांचे आवडते खाद्य शेवाळ, कीटक, अळ्या, पाणकिडे आणि छोटे मासे हे आहे. 

पक्षी अभ्यासकांनी नेरूळ खाडीकिनाऱ्यावर येणाऱ्या पक्ष्यांचे छायाचित्रे सोशल मीडियावर टाकले होते. त्यामुळे खाडीकिनारी हजेरी लावून पक्ष्यांच्या हालचाली, गुलाबी चादर पाहून समाधान वाटले. या ठिकाणी अनेक पक्षीप्रेमी, अभ्यासकही आले होते. 
- श्‍याम फडणवीस,
नागरिक, खारघर 

थंडी सुरू होताच विदेशी फ्लेमिंगो पक्षी मुंबई आणि गुजरात खाडीकिनाऱ्यावर लाखोंच्या संख्येने येतात. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तर संपूर्ण खाडीकिनारा गुलाबी झालेला दिसतो. नागरिकांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यास वेगळाच आनंद मिळतो. 
- नरेश सिंग,
पक्षी अभ्यासक

navi mumbai news views of flamingos Crowds of bird lovers on the banks of Nerul Bay

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.