Navi Mumbai : नवी मुंबईकरांच्या दृष्ट्टीने अतिशय महत्वाची बातमी हाती आली आहे. ती म्हणजे ८ ऑगस्ट रोजी नवी मुंबईच्या काही विभागात तब्बल १२ तास पाणीकपात करण्यात येणार आहे.
अधिक माहिती अशी कि, नवी मुंबई महानगरपालिकेने मोरबे धरण आणि दिघा दरम्यानच्या मुख्य पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम करण्याचे ठरविले आहे. यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतरही पुढचे एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मनपाने केले आहे.
नवी मुंबई पालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, सानपाडा, वाशी, कौपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या परिसरात पाणी कपात करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी १० ते रात्री १० या काळात हा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.