Navi Mumbai : घाटकोपर येथे वादळीवाऱ्यात महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातानंतर नवी मुंबई महापालिका यंत्रणा सरसावली आहे. शहरातील बेकायदा होर्डिंगचा शोध अतिक्रमणविरोधी पथकाने सुरू केला आहे.
या पथकाच्या सर्वेक्षणात बेलापूर ते दिघापर्यंत अवघे २३९ होर्डिंग अधिकृत परवानाधारक असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्यक्षात शहरात हजारो होर्डिंग बेकायदा उभे असल्याने त्यावर अतिक्रमणविरोधी पथकामार्फत लवकरच हातोडा चालवण्यात येणार आहे.
जाहिरातबाजी करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत विविध ठिकाणी महाकाय होर्डिंग उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळते. त्यामुळे पालिकेतर्फेही होर्डिंग उभारण्याकरिता जाहिरात कंपन्यांना परवानगी दिली जाते. होर्डिंग उभारण्यापूर्वी नियमांची पूर्तता करण्याच्या सूचना महापालिकेने संबंधितांना केल्या आहेत.
परंतु बऱ्याच कंपन्यांकडून त्याची पूर्तता केली जात नसल्याने घाटकोपर येथे दुर्घटना घडली. त्यानंतर नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना परवाने, नूतनीकरण आणि संरचना स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार काही कंपन्यांनी महापालिकेला प्रतिसाद दिला आहे. तसेच शहरातील बेकायदा होर्डिंगची अतिक्रमणविरोधी पथक आणि विभाग कार्यालयातर्फे शोधाशोध सुरू करण्यात येत आहे. परवाना विभागाने त्यानुसार अतिक्रमणविरोधी पथकाला दिलेल्या यादीनुसार महापालिकेने २५४ होर्डिंग, गॅन्ट्री आणि दुभाजकांमधील स्टँडीज उभारण्याची परवानगी दिली आहे.
त्यापैकी १५ होर्डिंगचे परवाना नूतनीकरण न केल्यामुळे ते तत्काळ पाडण्याच्या सूचना अतिक्रमण विभागाला दिल्या आहेत. अतिक्रमण विभागातर्फे शहरातील बेकायदा होर्डिंगची शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम संपल्यानंतर एक यादी तयार करून बेकायदा होर्डिंग पाडण्याचे काम सुरू होणार असल्याचे संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
- वाशी गावातील रस्त्याच्या लगत असणारे मोठे ६००, ८०० आणि ४०० चौरस फुटांचे असे एकूण सहा होर्डिंग पाडण्याचे आदेश महापालिकेने अतिक्रमणविरोधी विभागाला दिले आहेत.
- ऐरोली सेक्टर नऊ येथील प्रियांका हौसिंग सोसायटी येथे ६०० चौरस फुटाचे होर्डिंग.
- ऐरोली सेक्टर नऊ येथील वंदना अपार्टमेंट येथे ८०० चौरस फुटाचे होर्डिंग.
- ऐरोली सेक्टर नऊ येथील साईदीप अपार्टमेंट येथे ५२५ चौरस फुटाचे होर्डिंग.
- कोपरखैरणे सेक्टर दोन येथील पूजा अपार्टमेंटजवळ ६०० चौरस फूट आकाराचे होर्डिंग.
- वाशी सेक्टर नऊ येथे कैलास शिखर सोसायटीजवळ ६०० चौरस फुटाचे होर्डिंग.
- वाशी सेक्टर नऊ येथील एकता सोसायटी येथे ६०० चौरस फुटाचे होर्डिंग.
- वाशी सेक्टर २८ येथे ६०० आणि ८०० चौरस फुटाचे दोन होर्डिंग.
- नेरूळ सेक्टर एक येथे ८०० आणि ६०० चौरस फुटाचे दोन होर्डिंग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.