Navi Mumbai Crime : पोलिसांची मोठी कारवाई; सहा लाखांचे हेरॉईन व गांजा जप्त !

Uran Panvel Highway: पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपी राजन बाळा राठोड याच्याविरोधात उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे
Navi Mumbai police seized Heroin and ganja worth six lakhs  Uran Panvel  jasai
Navi Mumbai police seized Heroin and ganja worth six lakhs Uran Panvel jasaisakal
Updated on

Latest Navi Mumbai News | उरण-पनवेल महामार्गालगत जासई येथील सुरुंगपाडा येथे चहाची टपरी चालवण्याबरोबरच अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. राजन बाळा राठोड (३२) असे त्याचे नाव असून अमली पदार्थविरोधी पथकाने चहाच्या टपरीतून २१ ग्रॅम हेरॉइन व एक किलो गांजा, तसेच चिलीम, रिजला पेपर, गोगो, सिल्वर फॉइल पेपर असा सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मुंबईतील गोवंडी येथे राहणारा एक सराईत गुन्हेगार उरण-पनवेल महामार्गालगत एका पत्र्याच्या बंदिस्त शेडमध्ये हेरॉइन व गांजा यांसारख्या अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती.

Navi Mumbai police seized Heroin and ganja worth six lakhs  Uran Panvel  jasai
Navi Mumbai AirPort: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव, अंतिम ठराव पंतप्रधान कार्यालयात

त्यानुसार सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत नायडू, नीलेश धुमाळ, पोलिस हवालदार तायडे, गणेश पवार, पोलिस कॉन्स्टेबल चालक सोनकूळ आदींच्या पथकाने गुरुवारी (ता. ३) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जासई सुरुंग पाडा येथील चहाच्या टपरीवर छापा मारला.

या वेळी चहाच्या टपरीमध्ये २१ ग्रॅम हेरॉइन व एक किलो गांजा तसेच चिलीम, रिजला पेपर, गोगो, सिल्वर फॉइल पेपर असा सहा लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ व इतर वस्तू आढळून आल्या. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपी राजन बाळा राठोड याच्याविरोधात उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

Navi Mumbai police seized Heroin and ganja worth six lakhs  Uran Panvel  jasai
Navi Mumbai AirPort: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव, अंतिम ठराव पंतप्रधान कार्यालयात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.