Scam Alert
Scam AlerteSakal

Scam Alert : आयकर विभागाच्या नावाने धमकी देत प्राध्यापकाला घातला २१ लाखांचा गंडा; एकाला अटक

या प्रकरणातील १८ लाख ८० हजाराची रक्कम सायबर पोलिसांनी गोठवली आहे.
Published on

नवी मुंबई : आयकर विभागाची धमकी देऊन अटक करण्याची भीती दाखवत प्राध्यापकाकडून ऑनलाईन २१ लाख २२ हजार रुपये उकळणाऱ्याला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी चेन्नई येथून अटक केली आहे. या प्रकरणातील १८ लाख ८० हजाराची रक्कम सायबर पोलिसांनी गोठवली असून या टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

सीवुड्स भागात राहणाऱ्या एका प्राध्यापकाला नागपूर येथील बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण होत असल्याचे सांगून कॅनडात बेकायदा पार्सल पाठवले जात असल्याची भीती दाखवली होती. हा प्रकार देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याची भीती दाखवून आयकर विभागातर्फे कारवाई करण्याची धमकी देण्यात आली होती.

तसेच जामिनाच्या नावाखाली प्राध्यापकाचे बँक खाते गोठवत असल्याचा बहाणा करून त्यांच्याकडून तब्बल २१ लाख २२ हजार रुपये उकळले होते.

मात्र, त्यानंतरही वांरवार पैशांची मागणी केली जात असल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार सायबर पोलिसांना १८ लाख ८० हजाराची रक्कम गोठवण्यात यश आले असून बँक खाते, मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून चेन्नई येथून लोकेशकुमार नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.