शीsss ! ते प्रवासी पीत होते ट्रेनच्या टॉयलेटमध्ये भरलेलं पाणी..

शीsss ! ते प्रवासी पीत होते ट्रेनच्या टॉयलेटमध्ये भरलेलं पाणी..
Updated on

नवी मुंबई - आपण सर्वजण ट्रेनने कायम प्रवास करत असतो. ट्रेनमधील खाण्यापिण्याच्या काही गोष्टी विकत घेणं आणि सर्व्ह केलं जाणारं अन्न खाणं अनेकजण मुद्दामून टाळतात. याला कारण म्हणजे, आपल्याला एकतर माहित नसतं ते म्हणजे आपण विकत घेत असलेलं अन्न कुठं बनवण्यात येतंय आणि कोणत्या पदार्थांचा वापर करून बनवलं जातंय.

या आधी आपण स्टेशनवरच्या आणि ट्रेनमधील डर्टी जेवण्याच्या बातम्या पाहिल्यात वाचल्यात. या बातमीमध्ये आता आणखी एका अत्यंत भीषण आणि किळसवाण्या बातमीची भर पडलीये.

गलिच्छपाणाचा कळस 

ही गलिच्छ घटना घडलीये  तिरुनेलवेली-जामनगर एक्स्प्रेमध्ये (Tirunelveli-Jamnagar Express). या ट्रेमनधील एका अटेंडंटने काही प्रवाशांना चक्क ट्रेनच्या टॉयलेटमध्ये असलेल्या बेसीनधून भरलेलं पाणी विकल्याचं बोललं जातंय. यानंतर रेल्वे पोलिसांनी आता ट्रेनमध्ये अवैधरित्या आणि अशुद्ध पाणी विकणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरवात केलीये.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रवक्ते गिरीश करंदीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. KRCL च्या सेंट्रल कंट्रोल रूमकडे तिरुनेलवेली-जामनगर एक्स्प्रेमध्ये प्रवाशांना अशुद्ध पाणी देण्यात येत असल्याची तक्रार आली होती. या माहितीच्या आधारे RPF पोलिसांनी ट्रेनच्या B3 या AC कोचमध्ये तपासणी केली. यामध्ये सदर प्रवास्याने पोलिसांकडे त्यांना देण्यात येणाऱ्या पाण्याबद्दल तोंडी तक्रार केली.  

KRCLच्या रिजनल रेल्वे मॅनेजर उपेंद्र शेंडे यांनी देखील याबाबत अधिक माहिती दिली आहे. याबद्दल बोलताना उपेंद्र शेंडे यांनी सदर अटेंडंट याचं नाव रवींद्र व्यास असल्याचं सांगितलं. रवींद्र हा गुजरातमधील राजकोटचा रहिवासी आहे. मडगाव स्टेशनवर हा अटेंडंट ट्रेनमध्ये चढला. त्याने ट्रेनमधील प्रवाशांना अशुद्ध आणि सील नसलेलं पाणी विकायला सुरवात केली. उपेंद्र शिंदे यांनी दिलेल्या माहितीत, "या अटेंडंटने ट्रेनमधील टॉयलेटच्या बेसिनमधून पाणी भरल्याचा संशय व्यक्त केला जातोय" असं म्हटलंय.    

दहा दिवसांची कोठडी आणि १५०० रुपयांचा दंड 

दरम्यान ३० वर्षीय आरोपी रवींद्र व्यास याला दहा दिवसांची पोलिस कोठडी आणि पंधराशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. सदर इसम हा कंत्राटी कामगार आहे. 

Navi Mumbai Railway Staff Supplies toylet water to Passenger of the train

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.