Latest Mumbai News : खैरणे एमआयडीसीतील मिता ट्रॉनिक्स कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने किरकोळ कारणावरून कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात सिक्युरिटी गार्ड गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी नंदकिशोर दाभाडे या कामगाराला अटक केली आहे.
या घटनेत गंभीर जखमी झालेला सुरक्षा रक्षक दिलीपकुमार चौधरी (४४) व त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी नंदकिशोर दाभाडे हे दोघेही खैरणे एमआयडीसीतील मिता ट्रॉनिक्स या कंपनीत कामाला आहेत. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी कंपनीमध्ये जनरेटरसाठी लागणारे डिझेल रिक्षामधून आणण्यात आले होते.
रिक्षामधील डिझेलने भरलेले चार ते पाच कॅन उतवण्यासाठी सुरक्षा रक्षक दिलीपकुमार याने कंपनीत काम करणाऱ्या नंदकिशोर दाभाडे व इतर दोन कामगारांना बोलावले होते; मात्र नंदकिशोर याने रिक्षामधील कॅन उतरवण्यास नकार दिला होता. तसेच दिलीपकुमार याच्यासोबत वाद घालून त्याला धक्का दिला होता.
१० ऑक्टोबर रोजी सकाळी दिलीपकुमार सिक्युरिटीच्या केबीनमध्ये काम करत असताना, आपल्यासोबत आणलेल्या कोयत्याने नंदकुमारने दिलीपकुमार याच्या डोक्यामध्ये तीन हल्ले करून पलायन केले. या घटनेत दिलीपकुमार गंभीर जखमी झाल्याने त्याला कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी फरार झालेल्या नंदकिशोर दाभाडे याच्या विरोधात जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दाखल करून त्याला अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.