Latest Khanapur News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नाकाबंदीत पोलिसांनी खालापूर टोल नाक्यावर कोट्यवधीची चांदी पकडली असून शुक्रवारी (ता. २५) उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.
पिकअपमधून चांदीची मोठ्या प्रमाणात वाहतूक मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून होत असल्याची माहिती खालापूर पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने शुक्रवारी पहाटे खालापूर टोल नाका येथे सापळा रचला. एक पिकअप पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी सकाळी पावणेसातच्या सुमारास खालापूर टोल नाक्यावर आली.